राहू काल
वैदिक ज्योतिषानुसार राहूकाल हा दर दिवशी येणारा राहू काळ हा सुमारे दीड तासाचा काळ अशुभ असतो, असे काहीजण मानतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीचे आठ भाग केले, की त्यांतला एक भाग राहूकाल समजला जातो.
सूर्योदयानंतरच्या आठापैकी पहिला भाग हा नेहमीच शुभ असतो. तो राहू ग्रहाच्या वाईट प्रभावापासून नेहमीच मुक्त असतो.
त्यानंतरचे राहूकाल असे : सोमवारी आठातला दुसरा भाग; शनिवारी तिसरा भाग, शुक्रवारी ४था भाग, बुधवारी ५वा भाग, गुरुवारी ६वा भाग, मंगळवारी ७वा भाग आणि रविवारी ८वा भाग हे राहूकाल समजले जातात. दक्षिणी भारतातील लोक हा राहूकाल गांभीर्याने घेतात, आणि त्या काळात कोणतेही काम करीत नाहीत.