रावण ताड
रावणताड हे नारळासारखा वृक्ष आहे.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
हा वृक्ष विशेष करून समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात, महाराष्ट्रात अलिबाग आणि मुंबई येथे, गोव्यामध्ये, गुजरातेत दमणमध्ये आढळतो. डॉंकटर वर्तकांनी याला त्याच्या एका मूल खोडावर असलेल्या अनेक शाखांनी भरलेल्या डोक्यामुळे 'रावणताड' अशी उपाधी दिली आहे. याचे वृक्ष ४० ते ६० फुट इतके उंच असतात. मूळ खोड सुमारे १०-१२ फुट इतके उंच झाल्यावर त्याला दोन फांद्या फुटतात. या दोन फांद्या सहा फुट वाढीनंतर पुन्हा दुभांगतात आणि ही फांद्याची दुभंगण्याची क्रिया चालूच राहाते. फांद्या फुटणारा हा एकमेव वृक्ष आहे पामकुळातला.
सर्व दिशांनी 3 फुट लांबीची याची पाने पंख्याच्या रचनेची असतात. पानाच्या कडा शिरांच्या बाजूने फाटलेल्या असतात. पानाचे देठ वरच्या बाजूने खोलगट असून देठाच्या खालच्या बाजूच्या किनारीवर टोकदार काटे असतात. नर फुलोरा पानाच्या आतल्या खाचेतून उगवतो. या नर कोषांची लांबी ३ ते ४ फुटापर्यंत आणि व्यास दीड दोन इंच असतो. या फुलोऱ्यात मळकट पिवळ्या रंगांची फुले एकमेकांना चिकटून रचलेल्या खावल्यांमध्ये असतात. प्रत्येक खवल्यात तीन गोलट, गवती रंगाची फुले असतात. फुलांच्या पाकळ्या टणक आणि रबरासारख्या लवचिक असतात. त्यांच्यावर ठळक अशा उभ्या शिरा आढळतात. ताडगोळ्याच्या वृक्षाप्रमाणेच याच्या आखूड देठाच्या मादी फुलांचा फुलोरा वेगळ्या वृक्षावर येतो. याची फळे साधारण मोठ्याशा आंब्याच्या आकाराची असतात. या फळातील काथ्याचा भाग आतील बियांच्या मानाने फार मोठा असतो. वरच्या काथ्यामध्ये एक फट असते. बी रुजताना या फटींतूनच कोंब बाहेर पडतो. बी फळामध्ये त्याच्या मध्यभागापेक्षा थोडीशी वर असते. हा रावण ताड ठाणे जिल्हा, दक्षिण गुजरातचा किनारी प्रदेश येथे भरपूर पाहायला मिळतो. मुंबईत मात्र या मजेशीर ताडाचे अगदी मोजकेच नमुने आहेत. शिवडी, भांडूप येथे काही रावणताड आहेत. मलबार हिल जवळच्या डुंगरवाडी येथील पारसी कॉलनीजवळील एका बागेत आणि एका मोकळ्या जागेत सहा रावणताड आहेत. हे अतिशय सशक्तपणे वाढलेले रावणताड वाहत्या वाऱ्यामध्ये झुलतात तेव्हा मन्दोन्मत्त रावण आपल्याच मस्तीत झुलत असल्यासारखे वाटते. पण नुकतेच या जागेचे विश्वस्त असलेल्या पारसी पंचायतीने हे रावणताड उभे असलेली जागा विकसित करण्याचे ठरवले असून त्यातल्या सरसकट वृक्षतोडीमध्ये हे रावणताड कापले जाण्याची शक्यता आहे. तेथील संवेदनशील रहिवाशांनी एकत्र येऊन काही नेट लावला तरच त्यांचे प्राण वाचण्याची शक्यता आहे.
संदर्भ
संपादन- वृक्षराजी मुंबईची - मुग्धा कर्णिक[[१]]