राल्फ शुमाखर

(राल्फ शुमाकर या पानावरून पुनर्निर्देशित)

राल्फ शुमाखर (मराठी लेखनभेद: राल्फ शूमाखर, राल्फ शूमाकर ; जर्मन: Ralf Schumacher ;) (जून ३०, इ.स. १९७५ - हयात) हा जर्मन फॉर्म्युला वन चालक असून फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सात वेळा अजिंक्यपद मिळवलेल्या मिखाएल शुमाखराचा धाकटा भाऊ आहे. त्याने इ.स. १९९७ ते इ.स. २००७ या ११ वर्षांमधील फॉर्म्युला वन हंगामांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्याने १८० आरंभांमधून २७ वेळा शर्यती पुऱ्या केल्या, तर ६ शर्यती जिंकल्या. इ.स. २००८ साली राल्फ शुमाखर फॉर्म्युला वन ग्रांप्रीतून निवृत्त झाला.

राल्फ शुमाखर

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: