रामचंद्र शिवाजी कदम उर्फ राम कदम ( जन्म: २४ जानेवारी १९७२ - हयात) हे [[भारतीय janata paksha ]] या पक्षाचे घाटकोपरचे आमदार आहेत. त्याचा जन्म लातूर येथे झाला.

राम कदम (आमदार)
जन्म: २४ जानेवारी १९७२
लातूर, महाराष्ट्र, भारत
संघटना: भारतीय जनता पक्ष
धर्म: हिंदू
प्रभाव: राज ठाकरे

आमदार राम कदम यांचे निलंबन हे शपथ विधी सोहळ्याच्या वेळेसच करण्यात आले होते. मनसेने मराठीची भूमिका घेत मराठीतून शपथ घ्यावी याचा आग्रह करीत आमदार अबू आझमी यांना विरोध केला होता. ८ नोव्हेंबर २००९ रोजी राम कदम यांनी अबू आझमी शपथ घेण्यासाठी पुढे गेलेले असतानाच त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळेच राम कदम यांचे सुरवातीलाच तीन वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र एक वर्षात त्यांच्यावरील हे निलंबन मागे घेण्यात आले होते.[१][२]

१९ मार्च २०१३ रोजी पोलीस उपनिरिक्षक सचिन सूर्यवंशींना विधान भवनाच्या लॉबीत मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे व मरिन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नंतर विधासभाध्यक्षांनी २० मार्च २०१३ रोजी ३१ डिसेंबर २०१३ पर्यंत त्यांना निलंबित केले आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर २१ मार्च २०१३ रोजी यांनी मुंबई पोलिसांपुढे शरणागती पत्करली. पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने यांना २२ मार्चपर्यंत २०१३ पोलिस कोठडी दिली होती. पोलिस कोठडीची मुदत संपताच पोलिसांनी २२ मार्च २०१३ रोजी त्यांना सत्र न्यायालयात सादर केले. त्यावेळी सत्र न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.[३]

राजकीय वाटचालसंपादन करा

वैयक्तिकसंपादन करा

संदर्भसंपादन करा


बाह्य दुवेसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.