राधा रीजंट हॉटेल (चेन्नई)

राधा रीजंट हॉटेल भारताच्या चेन्नई शहरातील चतुर्तारांकित हॉटेल आहे. हे हॉटेल १९९७ मध्ये सुरू झाले. या हॉटेलचे पूर्वीचे नाव राधा पार्क इन होते.

ठिकाण

संपादन

हे हॉटेल भारत देशाच्या तामिळनाडू राज्यातील चेन्नई या राजधानीत १७१, जवाहरलाल नेहरू सलाई, अरुंबक्कम, पिन कोड-६००१०६ येथे आहे.

हॉटेल

संपादन

सरोवर हॉटेल्स आणि रिझॉर्ट्‌स या कंपनीचे भारतातील हे दुसरे आणि चेन्नईतील रिंग रोड परिसरात सुरू झालेले पहिले तारांकित हॉटेल आहे. या हॉटेलने चेन्नईत सन २००१ मध्ये जेफ्रीझ हा पहिला पब चालू केला होता.[] []या हॉटेलचा आतील आराखडा रामानन जे. यांनी १९९७ आणि २००४ मध्ये केला होता. ओरिएंट ब्लॉसम याचा आराखडा मुंबईतील प्रकाश मानकर आणि असोसिएट्स यांनी केला होता. या हॉटेलमध्ये ९१ खोल्या आहेत त्यात ६२ उत्तम प्रतीच्या २३ एक्झिक्युटिव्ह खोल्या, आणि ६ स्वीट्स आहेत. येथे ६ बकेट हॉल आहेत. त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ ६५०० चौरस फूट आहे. सन २०१३ मध्ये यांनी २०००० चौ.फूट. बौगाईन्विल्ले गार्डन बकेट हिरवळ (lawn) तयार केले त्यात ३००० अतिथी सामावू शकतात. या हॉटेलमध्ये लॉबी कॅफे, मल्टी क्विझीन, ओरिएंट ब्लॉसम, ओरिएंटल डेलिकसीज (२००४ मध्ये सुरू)[], जेफ्रीज पब, ऑरा नावाचा लाउंज बार (हा २००४ मध्ये वाढविला) यां उपहारगृहांचा समावेश आहे.

राधा रीजंट हॉटेल्सच्या विकासकानी बंगलोर येथे सन २००५ मध्ये राधा होमटेल हे व्हाईटफील्ड आणि सन २००८ मध्ये इलेक्ट्रॉनिक सिटी अशी आणखी दोन ३ स्टार हॉटेल्स सुरू केली. होमटेल हॉटेल हे सरोवर हॉटेल्स आणि रिझॉर्ट्‌सचे पहिले हॉटेल होते.[]

पुरस्कार

संपादन

या राधा रीजंट हॉटेलला, सरोवर हॉटेल्स अँड रिझॉर्ट्‌सतर्फे २००४ साली "सरोवर पार्क प्लाझा हॉटेल ऑफ द इयर" असा पुरस्कार देण्यात आला होता.

संदर्भ

संपादन
  1. ^ "पबिंग इन चेन्नई, चेन्नई गेट्स इट्स फर्स्ट पब जेफ्रीज" (इंग्लिश भाषेत). १७-०२-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "अ टेल ऑफ टू पब्स, द हिंदू १९ नोव्हेंबर, २००१" (इंग्लिश भाषेत). 2013-06-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७-०२-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "राधा रीजंट हॉटेल, चेन्नई फोर स्टार हॉटेल" (इंग्लिश भाषेत). १७-०२-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "सरोवर प्लान्स ५० होमेटेल बजेट हॉटेल्स इन ५ इयर्स, इकॉनॉमिक टाइम्स ऑन फेब २६, २००६" (इंग्लिश भाषेत). 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७-०२-२०१६ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)