राजेंद्र जवाहरलाल दर्डा

भारतीय राजकारणी आणि पत्रकार
(राजेंद्र दर्डा या पानावरून पुनर्निर्देशित)

राजेंद्र जवाहरलाल दर्डा हे भारतीय राजकारणी आणि पत्रकार आहेत. औरंगाबाद पूर्व मतदार संघातून ते काँग्रेस पक्षातर्फे तीनदा महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेले होते .

दर्डा राज्याचे उद्योग आणि शिक्षण मंत्री होते . सध्या लोकमत वृत्तपत्र समूहाचे ते एडिटर-इन-चीफ आहेत.