राजारामचरितम्
हा संस्कृत भाषेतील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना छत्रपती राजाराम महाराजांच्या दरबारी असलेल्या केशव पंडिताने इ.स.१६९० मध्ये केली.हा ग्रंथ तंजावर येथील सरस्वती महाल या ग्रंथालयातून संशोधक वा.सी.बेंद्रे यांनी शोधून काढला व हा ग्रंथ इ.स.१९३१ साली प्रसिद्ध करण्यात आला. या ग्रंथात संभाजी महाराजांच्या वधानंतरची परिस्थिती, राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास इत्यादी संबंधीची समग्र माहिती या ग्रंथातून मिळते.मराठ्यांचा इतिहासातील साधनातील हा महत्त्वाचा घटक आहे.