राग ही एक मनाची एक नकारात्मक अवस्था आहे.


जे इच्छेविरुद्ध घडते आणि स्वीकारता येत नाही, तेव्हा रागाचा उगम होतो. रागामुळे आपण कोणतेही काम नित करू शकत नाही.

व्याख्या

संपादन

रागाच्या व्याख्या पुढील प्रकारे करता येतील.

  • राग ही एक मनाची अवस्था आहे. ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असते.
  • मनाविरुद्ध घडणाऱ्या बाह्य घटनेला मनाने दिलेली ती एक नकारात्मक अशी तीव्र स्वरूपाची प्रतिक्रिया होय.
  • अपयश, ध्येयप्राप्तीच्या मार्गातील अडथळा, नैराश्‍य, वैफल्य, संशय, भीती यांवर मात करण्यासाठी आपल्या मनाने ती उभारलेली एक प्रकारची प्रतिकार यंत्रणा असते.

रागाची कारणे

संपादन

अ) जीवशास्त्रीय घटक- टेंपोरेल लोब आणि लिंबिक सिस्टिम कारणीभूत

  • विस्कळित स्वायत्त मज्जासंस्था
  • ॲड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण
  • डोपोमिन आणि सिरोटोनिन यांचा सहभाग

ब) अनुवांशिक घटक - रागाची भावना आनुवंशिक असू शकते.

  • XYY सिंड्रोम असणाऱ्या व्यक्ती
  • अनुवांशिक व्यक्तिमत्त्व दोष

क) मानसशास्त्रीय कारणे - तीव्र स्वयंकेंद्री असणाऱ्या व्यक्ती

  • चुकीचे विचार आणि कल्पना यात गुरफटणाऱ्या व्यक्ती
  • चिकित्सा न करता मत बनवणाऱ्या व्यक्ती
  • संशयी, आनंदी वृत्तीचा अभाव असणाऱ्या व्यक्ती
  • न्यूनगंड, लैंगिक दमन

राग व्यक्त करण्याचे प्रकार

संपादन
  1. शारीरिक ः सकर्मक-प्रत्यक्ष ः हाणामारी / शारीरिक इजा किंवा प्राणघातक हल्ला
  2. शारीरिक ः सकर्मक-अप्रत्यक्ष ः दुसऱ्या माणसांच्या मदतीने समोरच्या व्यक्तीला शारीरिक इजा पोचवणे किंवा प्राणघातक हल्ला करणे
  3. शारीरिक ः अकर्मक-प्रत्यक्ष ः समोरच्या व्यक्तीला त्याला हव्या असणाऱ्या गोष्टीपासून जबरदस्तीने परावृत्त करणे
  4. शारीरिक ः अकर्मक-अप्रत्यक्ष ः समोरच्या व्यक्तीला हवी असलेली मदत मुद्दाम न करणे
  5. मानसिक ः सकर्मक-प्रत्यक्ष ः व्यक्तीचा अपमान करणे
  6. मानसिक ः सकर्मक-अप्रत्यक्ष ः समोरच्या व्यक्तीबद्दल अफवा पसरविणे
  7. मानसिक ः अकर्मक-प्रत्यक्ष ः समोरच्या व्यक्तीशी बोलण्याचे टाळणे
  8. मानसिक- अकर्मक-अप्रत्यक्ष ः समोरची व्यक्ती संकटात असेल तर मदत न करता तटस्थ राहणे

रागाचे परिणाम

संपादन
  • रागावणारी व्यक्ती ज्या व्यक्तीवर रागावते, त्या व्यक्तीस मानसिक त्रास होतो. रागाचे प्रमाण जास्त आणि अयोग्य असेल तर समोरच्या व्यक्तीमध्ये नैराश्‍याची; तसेच तीव्र रागाची भावना निर्माण होऊ शकते. नंतर तो कशा प्रकारे प्रतिक्रिया देईल, हे सांगता येत नाही. यातून भांडण-तंटा, मारामारी किंवा इतर टोकाच्या घटना घडू शकतात.
  • साधारणपणे आपल्या जवळच्या म्हणजे घरातील व्यक्तीवरच राग व्यक्त करण्याची सवय असते. कारण बाहेर आलेला राग त्या ठिकाणी व्यक्त करता येऊ न शकल्याने अशा व्यक्ती तो राग दडपून टाकते. मग घरी आल्यानंतर ज्या व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत किंवा मृदु स्वभावाच्या आहेत, त्यांच्यावर हा राग काढला जातो. म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर!
  • या अशा सतत व्यक्त होणाऱ्या रागामुळे घरातील मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. त्यांच्यामध्ये भीती, नैराश्‍य, न्यूनगंडाची भावना आणि त्यातूनही पुन्हा रागाचा उद्रेक होऊन तो इतरांना घातक ठरू शकतो. म्हणूनच कौटुंबिक प्रगतीला अडथळा निर्माण होतो.
  • राग अनावर असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासातील व्यक्तींच्या मानसिकतेवर आणि व्यक्तिमत्त्वावर दीर्घकालीन विपरीत परिणाम होतात. नातेसंबंध बिघडतात, कामावर समाजव्यवस्थेचा परिणाम होतो.
  • रागीट स्वभावाची व्यक्ती जर उच्चपदस्थ असेल तर रागाच्या भरात त्याने घेतलेला निर्णय समाजासाठी घातक ठरू शकतो.
  • रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे कारण रागाच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ शकतो.

रागावणाऱ्या व्यक्तीवर होणारे परिणाम

संपादन

या व्यक्तीमध्ये

  • मनोविकाराचे, तसेच शारीरिक आजाराचे प्रमाण जास्त असते.
  • अस्वस्थता, बेचैनी, नैराश्‍याची भावना, मंत्रचळेपणा; तसेच रक्तदाब, मधुमेह, संधिवात, हृदयविकार, व्यसनाधीनता, आत्महत्येची प्रवृत्ती, अपघातांचे वाढते प्रमाण इत्यादींचे प्रमाण जास्त असते.
  • काही रागीट व्यक्तींमध्ये राग, पश्‍चात्तापाची भावना, नैराश्‍य, व्यसनाचा आधार आणि पुन्हा राग, पश्‍चात्ताप, नैराश्‍य त्यातून इतरांना किंवा स्वतःला इजा पोचवण्याची ऊर्मी अशी मालिका दिसून येते. म्हणजेच अनियंत्रित राग, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात दुष्परिणाम घडवून आणतो.

रागावर नियंत्रण

संपादन
  • पहिली पायरी म्हणजे आपण रागावलो आहोत, हे ओळखणे किंवा मान्य करणे.
  • इतके रागावणे योग्य आहे का, याचा विचार करणे.
  • आपल्या रागावण्याचे आपल्याच मनावर, कुटुंबावर आणि शरीरावर काय परिणाम होतील, याचा विचार करणे
  • समोरच्या व्यक्तीच्या ठिकाणी आपण स्वतः आहोत, अशी कल्पना करणे.
  • आपला विचार, आपली मते सतत तपासून पाहणे-माफ करणे, सोडून देणे या गोष्टी मोठ्या असतात. त्यांचा विचार करणे.
  • आपला राग खरेच अनावर होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे.[]
  • आपल्याला राग आला कि आपण बसण्यच्या स्थितीत किवा झोपण्याच्या स्थितीत जायचं.


बाह्य दुवे

संपादन
  1. ^ [१][permanent dead link]