राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस

राईटिंग कास्ट राईटिंग जेन्डर: रीडिंग दलित विमेन्स टेस्टीमोनियोस हे शर्मिला रेगे लिखित पुस्तक झुबान दिल्ली यांनी २००६ मध्ये प्रकाशित केले आहे. लिंगभाव आणि जातींचा अभ्यास करणाऱ्या हे महत्त्वाचे पुस्तक आहे.या पुस्तकात दलित साहित्याची लिंगभावाच्या दृष्टीकोनातून सैद्धांतिक मीमांसा केली आहे.

प्रस्तावना

संपादन

समाजशास्राच्या आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना दलित चळवळ आणि साहित्य आणि साहित्याविषयी पडलेल्या ज्ञानात्मक आव्हानांना प्रश्न करून या प्रश्नांची सुरुवात होते. ब्राम्हणांनी शूद्रांचा अभ्यास करायचा आणि दलित सिद्धांकने मांडायची या पद्धतीमुळे ज्ञानात्मक संरचना आणि जातितील संरचना यांमधील फारकत लक्ष्यात येते. मंडल काळानंतर नागरिकत्व किंवा गुणवत्तेच्या व्याख्येच्या आधारे जातींचे पुनरुत्पादन मांडणे हे जातिविषयक अभ्यासापुढील आव्हान होते. लिंगभाव विहित जात किंवा जातीविहीत लिंगभाव या संकल्पनांना दलित स्त्रीवाद्यांनी आव्हान दिले. डरबन परिषदेमध्ये दलितांच्या मानवी हक्कांविषयी केली गेलेली मांडणी हे ही जातिविषयक अभ्यासाला आव्हान होते.

भारतातील स्त्रीवादी अभ्यासाने लिंगभाव हे अभ्यासाचे एक मुल्य म्हणुन मान्यता मिळविण्यासाठी लढा दिला. जात समजावून घेण्याच्या अभिजन संरचनांमुळे स्त्री अभ्यासाला धक्का पोहचला. काही मोजक्या स्त्री अभ्यासकांनी दलित स्त्रीवादाला हात घातला. जात हा केवळ दलित स्त्रियांचा प्रश्न आहे, हा या दोषात गुरफटलेल्या, गोठलेल्या सवर्ण स्त्रियांच्या प्रतीवादाला न्याय म्हणता येणार नाही. जात आणि लिंगभावावर आधारित शोषणाचे गुंतागुंतीचे इतिहास या प्रक्रियेत हरवले. सवर्ण स्त्रिया या ब्राम्हणी असतात असे काही दलित स्त्रीवाद्यांचे म्हणणे ही खरे नाही. ब्राम्हणांचे ब्राम्हणी असणे आणि ब्राम्हणेत्तरांचे अब्राम्हनी असणे यात निसरडे अंतर आहे. सवर्ण स्त्रियांचे जातीविषयक एकसूत्री आकलनामुळे विविध संस्कृतीतील छुपे हिंसाचार नजरेआड होतात. जातीअंताच्या लढयात " खाजगी अनुभव" आणि सार्वजनिक वागणुक ही जात आणि लिंगभावाच्या आधारे कशी तपासता येईल हा या पुस्तकातील मुख्य प्रश्न आहे. लिंगभाव आणि दलित अभ्यास यांतील गुंता तपासणे हा या पुस्तकाचा ज्ञानात्मक हेतू/पवित्रा आहे. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रातील किंवा लेखिकेच्या भाषेत साक्षी किंवा जबानीतून जातीविषयक अनुभव हे पुस्तक बोलते करते.

ठळक मुद्दे

संपादन

प्रस्तावनेनंतरच्या पहिल्या विभागात दलित आत्मकथनांचे महत्त्व आणि उपयोगाविषयी लिहिले आहे. दलित आत्मकथने इंग्रजीमध्ये भाषांतरीत करण्याला जरी लोकप्रियता लाभली असली तरी यातुन उद्धभवणारे दोन धोके लक्षात घेतले पाहिजेत.

  1. विशिष्ट पद्धतीच्या साहित्याचा गवगवा आणि प्रकाशनावर सवर्णांचा ताबा असणे.
  2. कोणत्या रचना निवडायच्या आणि कोणी त्यांचे भाषांतर करायचे याचे राजकारण.

नव-उदारमतवादी बाजारपेठेने दलित चळवळीला दुबळे करण्यासाठी किंवा गिळंकृत करण्याचा डाव आणि दलित आत्मकथनांची अचानक झालेली गर्दी यांचा संबंध आनंद तेलतुंबडे आणि गेल ऑम्वेट यांसारखे लेखक आणि इतिहासतज्ञ लावतात. आंबेडकरवादाशी आणि दलित राजकारणाशी सुतनाम संबंध न लावता वेदनांच्या कहाण्या अशा स्वरूपात दलित आत्मकथने वाचल्यामुळे ती लोकप्रिय झाली असे आपण म्हणु शकतो. अभ्यासक्रमामध्ये दलित लिखाणानांचा प्रतिकात्मक समावेश हा एक दुसरा मुद्दा आहे. या विषयावर दलित साहित्य वर्तुळात कोणत्या मुद्द्यावर चर्चा घडतात हे रेगे यांनी नमूद केले आहे. अशा चर्चांमध्ये या साहित्याला विद्रोही साहित्य म्हणणे हे १९६० नंतर घडले.

१९२८ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारत मध्ये दलित ही संज्ञा वापरली. काही दलित अभ्यासकांना ही आत्मकथने म्हणजे मेलेली मढी उकरून काढणे/ उकरणे असे वाटते. तर समाजाची ही महत्त्वपूर्ण लक्षणे अधोरेखित करण्यासाठी ही आत्मकथने उपयुक्त आहेत असे काहींचे म्हणणे आहे. गंगाधर पानतावणे आणि इतर साहित्यिक दलित आत्माकथनांचे राजकीय महत्त्व अधोरेखित करतात. अप्रिय भूतकाळाची उजळणी करण्याचा आरोप जरी असला तरी या आत्मकथनांतुन दलित जगण्यातील अंधकार आणि अनेक अपसमजांविषयी हा प्रत्यक्ष मार्ग आहे. दलित आत्मकथने या साक्षी/ जबान्या असून त्या माणसाबद्दल आणि माणसापल्याड पाहतात. जाती आधारित शोषणाच्या इतिहासाला "अधिकृतपणे" विसरण्याला ही आत्मकथने आव्हान देतात. भूतकाळात दडलेल्या सत्याला ही आत्मकथने पुन्हा वर आणतात. बेवर्ली यांचा दाखला देत रेगे मांडणी करतात की, वैयक्तिक आत्मकथने ही खरे तर त्या समूहाची शोषणे आणि लढे सांगण्यासाठी केलेली असतात. सांगणारा वाचणाऱ्याच्या प्रतिसादासाठी आवाहन करतो. एका बाजूला या जबान्या किंवा आत्मकथने सामुहिक मान्यतेची अपेक्षा करतात. तर दुसऱ्या बाजूला व्यक्तींवर असलेल्या समूहाच्या दबावाचे अनुभव ते उघडपणे सांगतात.

प्रतिसाद

संपादन

एकॉनोमिक एंड पोलिटीकल विकली या नियतकालिकात करीन कपाडिया[] या पुस्तकाचे परीक्षण केले आहे. त्या म्हणतात, या पुस्तकात महाराष्ट्रातील आठ दलित महिलांच्या आत्मकथनपर मौखिक इतिहासाची मांडणी केली आहे. अशाप्रकारे भाषांतर केलेले हे पहिलेच पुस्तक आहे. असे असले तरी ब्राम्हणेतर दृष्टिकोन हा दलित दृष्टीकोनापेक्षा वेगळा असतो असे ही त्या नमूद करतात.

स्त्रीवादी इतिहासलेखनाच्या प्रवाहामध्ये हे लिखाण महत्त्वाची भर घालते असे जानकी नय्यर[] यांनी म्हणले आहे. त्या म्हणतात की, “ रेगे आत्मकथनांना साक्ष अशी संज्ञा वापरतात. दलित स्त्री ही जातीचे वर्चस्व आणि गरजा या अवकाशात जगात असते त्यामुळे तिच्या दमनाची तुलना इतर कोणत्याही बुर्ज्वा कथनाशी करता येत नाही. सर्वसाधारण उच्चजातीय मध्यमवर्गीय स्त्रियांच्या राष्ट्रवादी चळवळीच्या एकसुरी अनुभवांना नाकारण्यासाठी ही संज्ञा मदत करते...त्यांचे (रेगे) पुनःकथन दलित अत्याचारांच्या विशिष्ट अनुभवांवर लक्ष केंद्रित करते. परंपरागत इतिहासलेखनामध्ये जात हा सामाजिक प्रश्न नसून राजकीय मुद्दा आहे असे सांगणाऱ्या पर्यायी दलित अवकाशाच्या उदयावर लेखिका प्रकाश झोत टाकते.

महत्त्वाच्या संकल्पना

संपादन

जातीच्या अभ्यास

लिंगभाव अभ्यास

दलित साहित्य

दलित चळवळ

लिंगभाव विहित जात

जातीविहीत लिंगभाव

डरबन परिषद

स्त्री अभ्यास

दलित स्त्रीवाद

साक्षी

आनंद तेलतुंबडे

गेल ऑंमव्हेट

आंबेडकरवाद

संदर्भ सूची

संपादन

Kapadia Karin, Economic and Political Weekly, Vol. 42, No. 50 (Dec. 15 - 21, 2007), pp. 27-29</ref>

Nair Janaki, The Lateral Spread of Indian Feminist Historiography, Journal of Women's History, Volume 20, Number 4, Winter 2008, pp.177-184 (Review)

हे सुद्धा पहा

संपादन

लिंगभाव अभ्यास

दलित वाङ्मय

स्त्री अभ्यास

दलित स्त्रीवाद

  1. ^ http://www.jstor.org/stable/pdf/40277047.pdf?acceptTC=true
  2. ^ https://muse.jhu.edu/journals/journal_of_womens_history/v020/20.4.nair.pdf