रवींद्र गुर्जर हे एक मराठी अनुवादक-लेखक आहेत. त्यांची पस्‍तीसहून अधिक अनुवादित पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

गुर्जरांची गायत्री साहित्य नावाची प्रकाशन संस्था आहे. त्यांच्या संस्थेने सुधा मूर्ती यांचे वाईज अँड अदरवाईज या पुस्तकाचे संस्कृत भाषांतर प्रकाशित केले आहे. लेखन-प्रकाशनावरोबरच ग्रंथालय चळवळ, वाचन संस्कृती विकास, कार्यशाळा आदी विषयांवर मार्गदर्शकपर व्याख्यानांच्या माध्यमांतून गुर्जर साहित्य चळवळीत कार्यरत आहेत.

पुस्तके

संपादन
  • अकल्पिता (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक जेम्स हॅडले चेस)
  • ॲंग्री हिल्स – सहअनुवादक चंद्रशेखर बेहेरे (मूळ लेखक – लिऑन उरीस)
  • अल्बर्ट आइन्स्टाईन (अनुवादित चरित्र, मूळ इंग्रजी लेखक ॲलिस कॅलाप्राइस, ट्रेव्हर लिप्सकोम्ब)
  • इस्राइलची गरुडझेप (ऑपरेशन एन्टेबी)
  • कोमा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक रॉबिन कुक)
  • गुड बाय हिटलर
  • गॉडफादर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक मारियो पुझो)
  • चार्ली चॅप्लिन (चरित्र)
  • तिसरे महायुद्ध
  • द पेलिकन ब्रीफ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक जॉन ग्रिशॅम)
  • द स्टार्स शाइन डाऊन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक सिडने शेल्डन)
  • द स्पाय हू केम इन फ्रॉम द कोल्ड
  • पॅपिलॉन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक हेन्‍री शॅरियर). : गुर्जरांचे हे पहिले पुस्तक.
  • फर्स्ट टु डाय (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक जेम्स पॅटरसन)
  • बँको (पॅपिलॉनचा उत्तरार्ध)
  • मम आत्मा गमला
  • सत्तर दिवस (पिअर्स पॉल रीड या लेखकाच्या ‘अलाइव्ह’ कादंबरीचा मराठी अनुवाद)
  • सिसिलियन (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक मारियो पुझो)
  • सुवर्णयोगी (अनुवादित कादंबरी)
  • सेकंड लेडी (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक आयर्विंग वॅलेस)

पुरस्कार

संपादन
  • गुर्जर यांना राजहंस प्रकाशनाचा ‘रेखा ढोले’ स्मृती पुरस्कार मिळाला आहे. (२०१६)
  • रवींद्र गुर्जरांना पुणे मराठी ग्रंथालयाने एक हजार रुपयांचा पुरस्कार आणि मानपत्र दिले आहे. (२००२)