रत्नाकर गायकवाड
रत्नाकर यशवंत गायकवाड ( ३० मे १९५२) हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आहेत.[१] महाराष्ट्राचे माजी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड हे द बाँबे शेड्युल्ड कास्ट्स इम्प्रुव्हमेंट ट्रस्टचे सल्लागार होते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी २९ जुलै १९४४ रोजी ही सामाजिक संस्था स्थापन केली होती.[२] अमरावती जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच गडचिरोली, सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि मुंबई महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त. महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कामगार आयुक्त, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय सचिव, ते परिवहन मंत्रालय आणि उत्पादन शुल्क विभागचे प्रधान सचिव होते.
संदर्भ
संपादन- ^ "About Shri Ratnakar Yeshwant Gaikwad". sic.maharashtra.gov.in. 2021-02-28 रोजी पाहिले.
- ^ "महाराष्ट्र के मुख्य सूचना आयुक्त रत्नाकर गायकवाड़ पर औरंगाबाद में हमला". आज तक (हिंदी भाषेत). 2021-02-28 रोजी पाहिले.