रताळ्याचे गोड काप
साहित्य
संपादन- अर्धा किलो रताळी
- १ वाटी साखर
- १ वाटी ओला नारळ
- ५-६ वेलदोडे
- तूप
कृती
संपादनरताळयाची साले काढून विळीवर त्याचे गोल काप करावेत व स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात २ टेबलस्पून डालडा घालून त्यात धुतलेल्या फोडी घालाव्यात. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. झाकणीवर थोडेसे पाणी घालावे. म्हणजे फोडी मऊसर, छान शिजतात, नंतर रताळी शिजल्यावर त्यात नारळ, साखर व वेलची पूड घालावी. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. हे रताळयाचे काप लहान-मोठया सर्वांना फार आवडतात.
संदर्भ
संपादनhttp://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/ratalycheykaap