रताळ्याचे गोड काप

(रताळयाचे गोड काप या पानावरून पुनर्निर्देशित)

साहित्य संपादन

  • अर्धा किलो रताळी
  • १ वाटी साखर
  • १ वाटी ओला नारळ
  • ५-६ वेलदोडे
  • तूप

कृती संपादन

रताळयाची साले काढून विळीवर त्याचे गोल काप करावेत व स्वच्छ धुऊन घ्यावेत. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात २ टेबलस्पून डालडा घालून त्यात धुतलेल्या फोडी घालाव्यात. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. झाकणीवर थोडेसे पाणी घालावे. म्हणजे फोडी मऊसर, छान शिजतात, नंतर रताळी शिजल्यावर त्यात नारळ, साखर व वेलची पूड घालावी. मंदाग्नीवर रताळी शिजू द्यावीत. हे रताळयाचे काप लहान-मोठया सर्वांना फार आवडतात.

संदर्भ संपादन

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/ratalycheykaap