रघुनाथ बोरकर

हे लेखक असून त्यांनी मुख्यतः विदर्भातील पुरातत्त्वीय स्थळांवर लेखन केले आहे

डॉ. रघुनाथ रा. बोरकर हे लेखक असून त्यांनी मुख्यतः विदर्भातील पुरातत्त्वीय स्थळांवर लेखन केले आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्याच्या पुरातत्त्व व वस्तूसंग्रहालये विभागातील निवृत्त अधिकारी आहेत.

डॉ. र.रा.बोरकर
जन्म नाव रघुनाथ रा. बोरकर
जन्म ४ सप्टेंबर इ.स. १९५१
शिक्षण एम.ए., पीएचडी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र पुरातत्त्वशास्त्र, इतिहास, संग्रहालयशास्त्र
भाषा मराठी
साहित्य प्रकार ऐतिहासिक

प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र या विषयात नागपूर विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. भोपाळ विद्यापीठातून संग्रहालयशास्त्र विषयाची पदवीका प्राप्त केली. पुढे विद्यावाचस्पती पदवीही मिळवली.

किल्ले इतिहास व पुरातत्त्वशास्त्र या विषयावर त्यांनी काही ग्रंथलेखन केले, तसेच याच विषयांवर १४५ हून अधिक शोधनिबंध प्रकाशित आहेत.


ग्रंथलेखन

संपादन
  • रत्‍नागिरी जिल्ह्यातील किल्ले
  • महाकाली चंद्रपूरची
  • रामटेक
  • कोहळी समाज आणि त्यांचा इतिहास
  • किल्ले गाविलगड नरनाळा
  • पुरातत्त्वीय शोध
  • भारतीय पुरातत्त्वशास्त्र
  • नांदीकटातील मंदिरे
  • चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याचे पुरातत्व
  • संग्रहालय शास्त्र
  • मध्ययुगीन विदर्भाचा इतिहास
  • वाढोना येथील विठ्ठल-रूक्मिनी मंदिर
  • चंद्रपुर-गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास