रक्तरोडा
रक्तरोडा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रक्तरोडाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
- संस्कृत-रक्तरोहितक
- हिंदी-रोहितक,रोहेडा
- गुजराती-रगतरोहिडा
- लॅटिन-Tecama undulata
वर्णन
संपादनरक्तरोड्याचा मोठा वृक्ष असतो. ही झाडे डोंगराळ प्रदेशात आढळतात. त्याच्या पानांच्या दाटीत फुलांचे घोस येतात, त्या पाठोपाठ फळे लागतात. ही फळे मिऱ्यांहून मोठी, गोल, लाल रंगाची असतात. टपोरी गोल बोराच्या आकाराची हिरवी फळे पिकल्यावर किंचित पिवळट होतात. पिकलेले फळ झाडावरच तडकते. या फळाच्या आत लालभडक वेष्टनात लपेटलेल्या बिया असतात. याची संयुक्त पाने गुळगुळीत असून याचे खोड पिवळे असते. हा वृक्ष बाल्यावस्थेत असताना सर्वांगावर रेशमी लव असते.
संदर्भ
संपादन- वृक्षराजी मुंबईची - डॉ.मुग्धा कर्णिक
उत्पत्तिस्थान
संपादनभारतात बहुतेक प्रदेशांत.
उपयोग
संपादनसर्वसाधारण -
आयुर्वेदानुसार -पानथरी, श्वेतप्रदर, माराने रक्तगोठणे इत्यादी विकारांवर
आयुर्वेदिक औषधी - रोहितारिष्ट