येरळा नदी
येरळा नदी ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.
येरळा नदी | |
---|---|
इतर नावे | येरळाई |
उगम | नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या उत्तरेकडील सोलकनाथ (Solknath ) टेकडीवर झालेला आहे |
पाणलोट क्षेत्रामधील देश | सातारा, सांगली, महाराष्ट्र |
लांबी | ५६ किमी (३५ मैल) |
उगम स्थान उंची | २३ मी (७५ फूट) |
ह्या नदीस मिळते | कृष्णा |
उपनद्या | नांदनी |
धरणे | नेर धरण, येरळवाडी |
येरळा ही नदी प्रचीन काळी वेदावती या नावाने ओळकली जाई. या नदीच्या तीरावर बसीन ऋषि वेद पठण करीत. या नदीवर नेर आणि येरळवडी ही दोन लहान ब्रिटिशकालीन धरणे आहेत. येरळा नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके खटाव, खानापूर, तासगाव तालुक्यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी ही सहामाही वाहिनी असून इतर सहा महिने नदीचे पात्र कोरडे असते. इ.स. १९८० सालापासून या खोऱ्यातील अत्यल्प पावसामुळे या नदीच्या खोऱ्यातील लोक भीषण दुष्काळाचा सामना करत आहेत. येरळा नदीचे खोरे आणि माण नदीचे खोरे पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी मराठवाडा समजले जाते. माण आणि येरळा या नद्यास नदी जोड प्रकल्प अतिआवश्यक आहेत. या नदीला जर पुनरुज्जीवित करायचे असेल आणि बारा महिने वाहती ठेवायचे असेल तर नदी जोड प्रकल्पाची, तसेच नदीच्या पात्रातील वाळू उपसा थांबवण्याची गरज आहे.
येरळा नदीच्या किनारी खटाव तालुक्यात नागनाथवाडी येथे पुरातन शिवमंदिर आहे. याच येरळा नदीच्या किनारी पुसेगावचे श्री सेवागिरी महाराज यांचे मंदिर आहे. खटाव येथील प्रसिद्ध हेमाडपंती पिंपळेश्वर मंदिर व पांडवकालीन मंदिर ही येरळा नदी काठी आहेत.
येरळा नदी ही वसगडे या सांगली जिल्ह्यातील गावातून वाहत असताना, ती पुढे कृष्णा नदीला मिळते. ब्रह्मनाल येथे हा संगम होतो. या नदीवर वडूज, मायणी व भाकूची वाडी येथे जलसिंचन प्रकल्प आहेत.
येरळा नदी वर वडूज, मायणी, भकुचीवडी हे जलसिंचन प्रकल्प आहेत.. या नदीची लांबी १२५ कि मी आहे.(नक्की? की ५६ किमी?)