यास्मिन शेख
श्रीमती यास्मिन शेख (२१ जून, इ.स. १९२५ - ]]) या मराठी भाषेच्या व्याकरण-तज्ज्ञ आहेत. निरनिराळी नियतकालिके आणि वर्तमानपत्रे यांतून त्या मराठी भाषाविषयक विचार मांडत असतात.
यास्मिन शेख | |
---|---|
जन्म नाव | यास्मिन शेख |
जन्म |
२१ जून, १९२५ महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र |
तत्त्वज्ञान, |
मराठी माणसे बोलताना भाषेमध्ये परकीय शब्दांचा वापर सहजतेने करतात. मात्र असे करताना आपणच आपली मराठी प्रदूषित करीत आहोत याचे त्यांनी भान ठेवायला हवे. बोली भाषा कशीही असली, तरी ललित वाङ्मय असो किंवा वैचारिक लेखन, ते करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे, असे यास्मिन शेख यांचे मत आहे.[१]
व्यक्तिगत जीवन
संपादनत्यांना डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना अशा दोन मुली आहेत.
कार्य
संपादनप्रा. श्री.म. माटे यांच्या विद्यार्थिनी असलेल्या यास्मिन शेख यांनी श्री.पु. भागवत आणि साहित्यिक-नाटककार वसंत कानेटकर यांच्याबरोबर काम केले. डॉ. यास्मिन शेख यांनी व्रतस्थ वृत्तीने भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयासाठी आपले जीवन वाहून घेतले आहे. भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे, समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव त्यांनी सातत्याने करून दिली. त्यांच्या भाषाविषयक निरपेक्ष सेवेचा आणि तळमळीचा कितीही सन्मान केला तरी तो अपुरा आहे.
यास्मिन शेख यांची पुस्तके
संपादन- मराठी शब्दलेखनकोश
सन्मान
संपादन- नाशिक मधील सार्वजनिक वाचनालयातर्फे (सावानातर्फे) ४ व ५ ऑक्टोबर २००८ या दिवसांत झालेल्या नाशिक जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्षस्थान प्रा. यास्मिन शेख यांनी भूषवले होते.
- प्रा. यास्मिन शेख यांना २०१५ सालचा डॉ. गं.ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा.डॉ. शेषराव मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. (१७-८-२०१५).
- महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे यास्मिन शेख यांना डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २७ फेब्रुवारी २०१७ रोजी देण्यात आला.
- मसापचा जीवन गौरव पुरस्कार (२६ मे २०१७)