यशवंतराव थोरात (१६८८-१७१९) हे कोल्हापूरकर छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचे सेनाखासखेल आणि प्रमुख आधारस्तंभापैकी एक होते. छत्रपती संभाजींनी त्यांच्या शौर्यासाठी त्यांना 'सेनाखासखेल' हे पद बहाल केले. यशवंतराव थोरात हे वारणा खो-यातले एक पिढीजात वतनदार होते. छत्रपती संभाजींनी त्यांना विजापूर प्रांतात जहागीर दिली होती. त्यांनी आष्टा या ठाण्याला आपल्या कामकाजाचे मुख्यालय बनवले. १७१७-१७१९सालच्या दरम्यान त्यांनी विजापूर प्रांत आपल्या अधिकाराखाली आणला. जून १७१९मध्ये बाळाजी विश्वनाथ पेशवा यांच्या विरुद्ध लढताना‌ पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या आप्टी या ठिकाणी झालेल्या लढाईत त्यांना वीरमरण आले. इतिहासात ती लढाई 'आप्टीची लढाई' म्हणून ओळखली जाते.

यशवंतराव थोरात
सेनाखासखेल
Flag of the Maratha Empire.svg
कोल्हापूरच्या छत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले यांचे Flag of the Maratha Empire.svgसेनाखासखेल
अधिकारकाळ १७१७ - १७१९
पूर्ण नाव यशवंतराव सुभानजी थोरात
जन्म १६८८ (तारीख अनिश्चित)
(जन्मस्थान अनिश्चित)
मृत्यू जून १७१९
आप्टी, पन्हाळा किल्ला, महाराष्ट्र
उत्तराधिकारी उदाजीराव थोरात
वडील सुभानजी शिवाजी थोरात
पत्नी गोडाबाई
राजघराणे थोरात

सुरुवातीचा काळसंपादन करा

संदर्भसंपादन करा