यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य
केंद्र सरकारने अलीकडेच सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे नाव बदलून यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य असे नामकरण केले आहे. अभयारण्य १७º०६’३५’ उत्तर – १७º०९’४०’ उत्तर अक्षांश आणि ७४º२०’२०’ दरम्यान वसलेले आहे. आणि 74º24’20’’ E रेखांश महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात आहे. इ.स १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला.[१] अभयारण्य निर्माण परिश्रमांमागे स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र श्री. धो. म. मोहिते यांचा मोठा पुढाकार आहे.[२] [३]
भौगोलिक आणि वन्यजीव
संपादनयशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कृष्णा नदीच्या काठावर सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात येते. हे महाराष्ट्रातील एकमेव मानव निर्मीत अभयारण्य आहे.[४] अभयारण्याचे एकूण क्षेत्रफळ १०.८७ चौ. कि.मी. आहे. अभयारण्याच्या परिसरात सरासरी ४०० मि.मी. इतका पाऊस पडतो, येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. अभयारण्य परिसरातील वने ही उष्ण व कोरड्या हवामानातील पानझडी व काटेरी वनस्पतींची असून यात गवती मैदानाचा समावेश आहे. [५] सागरेश्वरा जंगलात श्वापदांची संख्या फारशी नसली तरीही येथील मृगविहारात सांबर, काळवीट भेर हे प्राणी संख्येने अधिक आहेत. [६]याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरं आदि प्राणीही येथे दिसतात. अनेक भारतीय पक्षी या जंगलात सुखेनैव विहार करतात. मात्र मोरांची संख्या खूप अधिक आहे.[७] वनसंपदाही उत्तम आहे. जवळपास ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात.
संदर्भ
संपादन- ^ "Yashwantrao Chavan Sagareshwar Wildlife Sanctuary" (PDF). Indiacode.nic.in (English भाषेत). 27 October 2022. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "'सागरेश्वर अभयारण्य' निसर्गसौंदर्याचा खजिना". pudhari.news (Marathi भाषेत). 23 August 2022. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सागरेश्वरचा कर्मयोगी- धों. म. मोहिते". Dainikprqbhat.com (Marathi भाषेत). 21 March 2021. 1 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 November 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य". esadhyanand.com (Marathi भाषेत). 4 March 2021. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "वन पर्यटन : सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य". loksatta.com (Marathi भाषेत). 24 May 2017. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सागरेश्वरच्या अभयारण्यात आढळला बिबट्या; रानगव्याचेही झाले दर्शन". dainikprabhat.com (Marathi भाषेत). 23 November 2020. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्याने जपली वनसंपदा; माळरानावर फुलले नंदनवन". Maharashtratimes.com (Marathi भाषेत). 23 July 2020. 27 October 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 October 2022 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)