म्हैस ही पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेली एक विनोदी काल्पनिक कथा आहे. रत्‍नागिरीहून मुंबईला चाललेल्या एका एस.टी. बससमोर एक म्हैस आडवी येते व त्यानंतरच्या झालेल्या एकूण गोंधळाचे वर्णन ह्या कथेत केलेले आहे. पु.लं.नी ह्या कथेमध्ये कोकणातील विचारसरणी, वागणूक इत्यादी बाबींचे चित्रण बारकाईने टिपले आहे. या कथेवर मराठीत एक चित्रपट होत आहे. (२-४-२०१३ची बातमी)

प्रमुख पात्रे संपादन

 • ड्रायव्हर: शिवराम गोविंद
 • म्हशीचा मालकः धर्मा मांडवकर
 • पुढारी: बाबासाहेब मोरे
 • झंप्या दामले
 • बघुनाना
 • मधू मालुष्टे
 • सुबक ठेंगणी
 • उस्मानशेट
 • गावकरी
 • डॉक्टर, शाळामास्तर, ऑर्डर्ली
 • आणि म्हैस.