मोहमद मोर्सी (अरबी: محمد مرسي عيسى العياط;) ( २० ऑगस्ट १९५१) हा इजिप्त देशाचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष आहे. २०११ सालच्या इजिप्तमधील क्रांतीनंतर हुकुमशहा होस्नी मुबारकची सत्ता उलथवून टाकण्यात आली. मे-जून २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून ३० जून २०१२ रोजी मोर्सी इजिप्तचा पहिला लोकशाही मार्गाने निवडून आलेला राष्ट्राध्यक्ष बनला.

मोहमद मोर्सी

इजिप्त ध्वज इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
३० जून २०१२ – ३ जुलै २०१३
मागील होस्नी मुबारक
पुढील अब्देल फताह एल-सिसी

जन्म २० ऑगस्ट, १९५१ (1951-08-20) (वय: ७३)
अल शार्किया, इजिप्त
राजकीय पक्ष मुस्लिम बंधुत्व
धर्म सुन्नी इस्लाम

सत्तेवर आल्यानंतर मोर्सीने इजिप्तच्या राज्यकारभाराची सर्व सुत्रे स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू केला. ह्या व इतर कारणांस्तव जनतेमध्ये अप्रिय बनलेल्या मोर्सीला केवळ एका वर्षानंतर जून २०१३ मध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर सत्ता सोडावी लागली.