मोहनदास गांधी हायस्कूल, राजकोट

मोहनदास गांधी हायस्कूल ही राजकोटमधील एक शाळा आहे. देशवासीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढा उभारण्याचा विचार देणाऱ्या महात्मा गांधी यांची जडणघडण ज्या शाळेत झाली ती ही शाळा होय. गांधी ज्यावर्षी या शाळेत होते तेव्हा या शाळेचे नाव आल्फ्रेड हायस्कूल होते, आणि त्याही पूर्वी राजकोट हायस्कूल. महात्मा गांधी या शाळेतून सन १८८७मध्ये वयाच्या १८व्या वर्षी मॅट्रिक होऊन बाहेर पडले.

स्थापना आणि नामबदल

संपादन

या राजकोट शाळेची स्थापना १७ ओक्टोबर १८५३ रोजी झाली. काठेवाडमधील त्यावेळची ती पहिलीच इंग्रजी माध्यमाची शाळा होती. शाळेची सध्याची गॉथिक शैलीतील इमारत १८७५ साली जुनागडच्या नबाबाने बांधली आहे. पुढे या शाळेला इडनबर्गचे ड्यूक आल्फ्रेड यांचे नाव देण्यात आले. १९४७ सालानंतर या शाळेचे नाव मोहनदास गांधी हायस्कूल झाले आणि शाळा गुजराती माध्यमाची झाली.

शाळा इतिहासजमा होणार

संपादन

ही मोहनदास गांधी हायस्कूल बंद करून तिचे रूपांतर संग्रहालयात करावे असा ठराव राजकोट महापालिकेचा प्रस्ताव गुजरात सरकारने २०१६ सालीच मंजूर केला आहे. लवकरच ही शाळा इतिहासजमा होईल.


.