Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


'गोष्ट काळाची' या डॉ. मेघश्री दळवी यांच्या पहिल्या विज्ञानकथेला मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञानरंजन कथा स्पर्धेत १९८८मध्ये प्रथम परितोषिक मिळाले आणि तिथून त्यांच्या विज्ञानकथा लेखनाला प्रारंभ झाला. त्यानंतर १९८९मध्ये याच स्पर्धेत त्यांच्या 'आगमन' या कथेला द्वितीय पारितोषिक मिळाले.

पुढे त्यांच्या विज्ञानकथा नवल, धनंजय, अनुभव, साहित्य, चैत्रेय, कथाश्री, झपूर्झा, प्रभात, पुण्यनगरी, पासवर्ड, लोकसत्ता, सॄष्टिज्ञान, अंतर्नाद, मराठी विज्ञान परिषद पत्रिका यासारख्या विविध मराठी प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. 

२०१०मध्ये त्यांचा पहिला विज्ञानकथा संग्रह 'प्रारंभ' प्रकाशित झाला. ‘प्रिमझाल मान’(२०१३) या दुसऱ्या विज्ञानकथा संग्रहानंतर त्यांनी ज्येष्ठ विज्ञानकथा लेखक लक्ष्मण लोंढे यांच्यासोबत संपादित केलेला विज्ञानकथा संग्रह ‘ब्रह्मांडाची कवाडं’ २०१६मध्ये प्रसिद्ध झाला. खास कुमारवयीन वाचकांसाठी 'चिक्कार नंतरच्या गोष्टी' हा त्यांचा तिसरा विज्ञानकथा संग्रह समकालीन प्रकाशनातर्फे २०२० मध्ये प्रकाशित झाला.

विज्ञानिनी, यंत्रमानव, मन्वंतर अशा अनेक नावाजलेल्या प्रातिनिधिक विज्ञानकथा संग्रहात त्यांच्या कथा समाविष्ट झालेल्या आहेत.

त्याशिवाय विज्ञान लेखिका म्हणून त्या मराठी वाचकांना परिचित आहेत. महाराष्ट्रातील नामवंत वर्तमानपत्रे आणि नियतकालिके यांमधून त्यांचे विज्ञानविषयक लेखन प्रसिद्ध होत असते.

इंग्रजीमध्ये त्यांचे विज्ञानविषयक लेख आणि विज्ञानकथा आंतरजालावर उपलब्ध आहेत. समीक्षा आणि संपादनातही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.

मेघश्री दळवींनी इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर सीमेन्समध्ये काही काळ मॅनेजर पदावर काम केले. त्यानंतर मॅनेजमेन्टमध्ये पीएचडी पूर्ण करून त्या टेक्निकल कम्युनिकेशन सल्‍लागार व संशोधक म्हणून काम करीत आहेत. टेक्निकल कम्युनिकेशन या विषयासंबधीचे त्यांचे लेख आणि मॅनेजमेन्टमधील शोधनिबंध नियमितपणे आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये प्रसिद्ध होत असतात.

प्रकाशित साहित्य संपादन करा

प्रातिनिधिक संग्रहात सामाविष्ट झालेल्या कथा संपादन करा

बाह्य दुवे संपादन करा

संभ्रम - अभिवाचन, जुलै २०२१

दिवाळी २०२० : मराठी विज्ञानकथा अजून ठराविक साच्यातून बाहेर का पडत नाही? अक्षरनामा, डिसेंबर ९, २०२०

बी मार्टमधली बाई, बहुविध, महाअनुभव दिवाळी २०२०

पाहुणा - प्रभात दिवाळी अंक, नोव्हेंबर २०२०

सफर - अभिवाचन, ऑगस्ट २०२०

पराडकरांची गोष्ट - उदय सबनीस यांनी केलेलं अभिवाचन, एप्रिल २०२०

लगोम, चैत्रेय वासंतिक, एप्रिल २०२०

दिवाळी २०१९ : ‘विज्ञानकथा’ या लेबलखाली येणाऱ्या कथा खरोखरच ‘विज्ञानकथा’ म्हणाव्यात का? अक्षरनामा, डिसेंबर ६, २०१९

सर्जा, पुढारी, नोव्हेंबर ३०, २०१९

विज्ञानकथांचे मराठीतील योगदान, ज्ञानभाषा मराठी दिवाळी २०१९

प्रवास, बहुविध - निवडक दिवाळी २०१८

आजची मराठी विज्ञानकथा कशी आहे? अक्षरनामा, एप्रिल ३०, २०१७

समीक्षण - ब्रह्मांडाची कवाडं, लोकप्रभा, नोव्हेंबर २५, २०१६

समीक्षण - ब्रह्मांडाची कवाडं, लोकसत्ता, नोव्हेंबर २०, २०१६

हेलिओफ्लॉवर्स, लोकसत्ता लोकरंग, ऑगस्ट २, २०१५

पट, लोकसत्ता लोकरंग मार्च १५, २०१५