मुरुम (त्वचारोग)
या त्वचा विकारात चेहऱ्यावर वेदनायुक्त कींवा वेदनारहीत मुरुम व पुटकुळ्या उत्पन्न होतात, या काही व्यक्तींमध्ये सौम्य तर काहींमध्ये तीव्र स्वरूपाच्या असतात. साधारणत: १३ ते २६ या वयोगटातील तरुणाई या विकाराने जास्त प्रभावीत असल्याने यास पिंपल्स, तारुण्यपिटीका किंवा मुखदुषिका असे म्हणले जाते.
तारुण्यात उत्कट असलेल्या हार्मोन्स व कफ इ.दोषांमुळे चेहऱ्यावरील त्वचेतील तैलग्रंथी(Sebaceous glands) व स्वेदग्रंथींमध्ये जास्त प्रमाणात तैलयुक्त स्त्राव तयार होतो व त्वचा तेलकट पडते हा स्त्राव दिवसेंदिवस वाढतच राहतो व या कालावधीत केलेल्या चुकीच्या आहार विहारामुळे अधिकच घट्ट होत जातो व तेथे(Sebaceous glands) जीवाणुंच्या वाढीसाठी अनुकुल वातावरण तयार होते. वाढलेले जीवाणु हे त्या ग्रंथीचा आकार वाढवुन त्याचे मुख(Pilosebaceous duct) बंद करतात व परिणामी चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या उत्पन्न होतात. तारुण्यपिटीका वाढवण्यात आहारासोबतच कॉस्मेटीक्स,वातावरण, मानसिक तणाव, मलावष्टंभ व ऋतुमान देखिल कारणीभुत असतात. तसेच पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना तारुण्यपिटीका जास्त भेडसावतात.
तारुण्य पिटीका (पिंपल्स) या त्वचा विकाराला तारुण्याला मिळालेला शाप म्हणले जाते कारण १३ ते २६ वयोगटातील ५० ते ६० % तरुण/ तरुणी या त्वचा विकाराने त्रस्त आहेत. या मुळे पर्सनॅलीटी मधे कमतरता वाटतेच सोबत कॉन्फीडंस सुद्धा कमी होतो म्हणुनच हा विकार तरुणांना शारीरिक व मानसिक कष्ट देतो. टीव्ही शो, चित्रपट, सौंदर्य स्पर्धा यामुळे सतेज व नितळ त्वचा व सुंदर दिसण्याच गोड स्वप्न सर्व तरुणाईच्या विशेषकरून तरुणींच्या मनात असते, पण बऱ्याच जणांसाठी हे दुरचे व पूर्ण न होणारे स्वप्न ठरते. या त्वचा विकारास प्रमुख कारण असते या वयातील उधानलेली हार्मोन्स, उत्कट झालेले कफ-वात-रक्त दोष व चुकीचा आहार- विहार.
मुरुम | |
---|---|
इतर नावे | मुरुमांचा वल्गारिस |
यौवना दरम्यान १८ वर्षांच्या पुरुषाला आलेले मुरुम | |
लक्षणे | ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, मुरुम, तेलकट त्वचा, डाग [१][२] |
गुंतागुंत | चिंता, आत्मविश्वासाची कमतरता, नैराश्य, आत्महत्येचे विचार [३][४] |
सामान्य प्रारंभ | यौवन [५] |
जोखिम घटक | अनुवंशशास्त्र [२] |
विभेदक निदान | फोलिकुलिटिस, रोझेशिया, हिद्राडेनिटिस सपुराटिवा, मिलिआरिया [६] |
उपचार | जीवनशैली बदल, औषधे, वैद्यकीय प्रक्रिया [७][८] |
औषधोपचार | अझेलिक ॲसिड, बेंझॉयल पेरोक्साईड, सॅलिसिक ॲसिड, प्रतिजैविक, जन्म नियंत्रण गोळ्या, आयसोट्रेटीनोईन [८] |
वारंवारता | 63.3 करोड प्रभावित (२०१५) [९] |
लक्षणे-
-चेहऱ्यावर शाल्मलीच्या काट्यांप्रमाणे पुटकुळ्या उत्पन्न होणे.
-पुट्कुळ्यांच्या ठीकाणी वेदणा, सुज व दाह असणे तसेच चेहरा निस्तेज व काळा पडणे.
-पुट्कुळ्यांच्या मध्यभागी ब्लॅकहेड किंवा व्हाइटहेड तयार होणे.
-पुटकुळ्यांमधुन पु युक्त स्त्राव बाहेर पडणे व चेहरा विद्रूप होणे.
-चेहऱ्याव्यतिरीक्त मान, पाठ यांवर देखिल पुटकुळ्या येतात तसेच डोक्यात कोंडा व खाज येते.
पिटीकांच्या कमी जास्त प्रमाणावरून त्यांच्या ४ ग्रेड केल्या जातात, पुढच्या ग्रेडच्या पिटीका उपचारास कठीण होत जातात.
*ग्रेड १- चेहऱ्यावर ३० किंवा त्यापेक्षा कमी मुरुम/ पुटकुळ्या उत्पन्न होणे.
*ग्रेड २- मुरुम व पु सदृश्य स्त्रावयुक्त पुटकुळ्या उत्पन्न होणे.
*ग्रेड ३- मुरुम, पु व वेदनायुक्त पुटकुळ्या तसेच जुन्या पुटकुळ्यांच्या ठीकाणी छोट्या गाठी तयार होणे.
*ग्रेड ४- पु युक्त स्त्रावी व वेदनायुक्त पुटकुळ्या, सुज व वेदनायुक्त गाठी, चेहरा निस्तेज होणे व कायमस्वरुपीचे काळसर पिटीकायुक्त व्रण चेहऱ्यावर तयार होणे.
कारणे-
आयुर्वेदानुसार तारुण्याच्या काळात होणाऱ्या या त्वचाविकारास कफ, वात व रक्तदुष्टी करणारा आहार-विहार कारणीभुत असतो.
- लवण, अम्ल व क्षारयुक्त पदार्थांचे अतिसेवन. कुळीद, उडीद, तीळ, मुळा यांसारख्या अभिष्यंदी पदार्थांचे अतिसेवन
- मासे, चहा-कॉफी, धुम्रपान,रात्री दही खाणे, उष्ण पदार्थ, अंबवुन बनवलेले खाद्य पदार्थ, दिवसाझोप, रात्री जागरण
- शिळे पदार्थ, फास्ट फुड/ जंक फुड, तळलेले समोसा, वडापाव यांसारखे पदार्थ यांचे अतिसेवन
- विरुद्ध आहार सेवन ( जसे- दुध व फळे एकत्र खाणे)
- केमिकल युक्त कॉस्मेटीक्सचा अतिवापर
- तसेच मलावष्टंभ, मानसिक तणाव, उष्ण- आर्द्रतायुक्त वातावरण व पित्तप्रकृती ही देखिल पिटीका वाढण्यास पोषक कारणे आहेत.
सूचना |
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा. |
उपाय
संपादन- एक कप दुध चांगले आटवावे . दाट झाल्यावर एक लिंबू पिळून हलवत असताना थंड करावे.रात्री झोपताना याला चेहऱ्यावर लावून चोळावे. रात्रभर लावलेले असू द्यावेसकाळी धुऊन घ्यावे.याने मुरुम बरी होऊन चेहरा उजळून तजेलदार होतो.
- मासुरची डाळ बारीक वाटून दुधात घुसळून घ्यावी . आणि चेहऱ्यावर लावावी . १० मिनिटांनी चेहरा धुऊन घ्यावा.आठवडाभर हा उपाय सकाळ-संध्याकाळी करावा.
- संत्र्याची साले १०० ग्राम घेऊन वळवून वाटून चूर्ण करावे यात १०० ग्राम बाजरीचे पीठ व १२ ग्राम हळद मिसळून पाण्यात भिजवुन चेहऱ्यावर लावावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. काही दिवसात चेहरा उजळून निघेल .
- गाजराचा रस,टमाट्याचा रस , बीटाचा रस २५-२५ ग्राम दररोज २ महिने पर्यंत प्यायल्याने चेहऱ्यावरची मुरुमे डाग व सुरकुत्या नाहीशा होतात.
- लिंबाचा रस गाळलेला , २ तोळे गुलाब अर्क ,२ तोळे गिल्सरीन मिसळून बाटलीत भरून टेवावे.रात्री झोपताना चेहऱ्यावर चोळून लावावे.२० दिवस उपचार केल्याने मुरुम पुटकुळ्या दूर होऊन त्वचा मऊ तजेलदार होते.
- दररोज किमान दोनदा आपला चेहरा धुवा. मेकअप वापरणे टाळा आणि तेल मुक्त त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरा.[१०]
संदर्भ
संपादन- ^ Vary JC (November 2015). "Selected Disorders of Skin Appendages--Acne, Alopecia, Hyperhidrosis". The Medical Clinics of North America (Review). 99 (6): 1195–211. doi:10.1016/j.mcna.2015.07.003. PMID 26476248.
- ^ a b Bhate K, Williams HC (March 2013). "Epidemiology of acne vulgaris". The British Journal of Dermatology (Review). 168 (3): 474–85. doi:10.1111/bjd.12149. PMID 23210645.
- ^ Barnes LE, Levender MM, Fleischer AB, Feldman SR (April 2012). "Quality of life measures for acne patients". Dermatologic Clinics (Review). 30 (2): 293–300, ix. doi:10.1016/j.det.2011.11.001. PMID 22284143.
- ^ Goodman G (July 2006). "Acne and acne scarring - the case for active and early intervention". Australian Family Physician (Review). 35 (7): 503–4. PMID 16820822. 21 April 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ James WD (April 2005). "Clinical practice. Acne". The New England Journal of Medicine (Review). 352 (14): 1463–72. doi:10.1056/NEJMcp033487. PMID 15814882.
- ^ Kahan, Scott (2008). In a Page: Medicine (इंग्रजी भाषेत). Lippincott Williams & Wilkins. p. 412. ISBN 9780781770354. 6 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ Mahmood SN, Bowe WP (April 2014). "Diet and acne update: carbohydrates emerge as the main culprit". Journal of Drugs in Dermatology (Review). 13 (4): 428–35. PMID 24719062.
- ^ a b Titus S, Hodge J (October 2012). "Diagnosis and treatment of acne". American Family Physician (Review). 86 (8): 734–40. PMID 23062156. 18 February 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
- ^ GBD 2015 Disease Injury Incidence Prevalence Collaborators (October 2016). "Global, regional, and national incidence, prevalence, and years lived with disability for 310 diseases and injuries, 1990-2015: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2015". Lancet. 388 (10053): 1545–1602. doi:10.1016/S0140-6736(16)31678-6. PMC 5055577. PMID 27733282.
- ^ "Acne treatment". Dr Niketa Sonavane.