मुद्रितशोधन म्हणजे इंग्रजीत प्रूफरिडींग किंवा प्रुफ तपासणे. छापला जाणारा मजकुर मुळ लेखनासारखाच(हस्तलिखित) असेल हे पहाणे नसल्यास,त्यात आवश्यक दुरुस्त्या करणे.पुर्वी मुद्रणात खिळे(टाईप) जोडुन जो मसुदा छापावयाचा त्याचा प्रथम साचा तयार करण्यात येत असे. त्याच्यासाठी खिळे (टाईप) एकत्र जोडुन वाक्यातील एक एक शब्द तयार केला जात असे. मग ते शब्द जोडुन वाक्ये,परिच्छेद,संपूर्ण पान असे तयार होते असे. त्याची कच्ची छपाई करून ते पान मग मुद्रितशोधनासाठी देण्यात येत असे. खिळे जोडण्यात चुका झाल्यास छपाई नीट होत नसे. खिळे जोडणारे कामगार हे अल्पशिक्षित वा अर्धशिक्षित असत. त्यांना भाषेचे किंवा शुद्धलेखनाचे सखोल ज्ञान नसे. त्यांच्या चुका सुधरविण्यास मुद्रितशोधनाचा जन्म झाला.हे काम करणाऱ्या व्यक्तीस मुद्रितशोधक (प्रुफरीडर) म्हणतात.

यात पहिले शोधन व अंतीम शोधन असे.यासमवेतच मुळ लेख वा मसुदा दिला जात असे.त्यावर हुकुम मुद्रितशोधन व त्यानंतर मग छपाई. मुलतः, मुद्रितशोधन करणारी व्यक्ती ही त्या त्या विषयात (ज्याची छपाई करावयाची)पारंगत हवी.त्या व्यक्तीस मजकुर ज्या भाषेत छापला जाणार आहे त्या भाषेचे सखोल ज्ञान हवे. त्यामुळे अचुकता येते. मुद्रितशोधनात वापरायच्या विशिष्ट अशा खुणा आहेत. छापलेले हे अनेक व्यक्तिंपर्यंत पोचत असल्यामुळे त्यात चुका झाल्यास वाचकाचा रसभंग होतो व त्या लेखकाची आणि छपाईची प्रतिष्ठा कमी होते असा सर्वमान्य समज आहे.

संगणकामुळे छपाईतंत्र झपाट्याने बदलले आहे.तरी मुद्रितशोधन हे आवश्यकच आहे.

प्रास्ताविकः

वृत्तपत्रे,साप्ताहिक,नियतकालिके,ग्रंथ,दिवाळी अंक,अहवाल,लहान-मोठी पत्रके यांसारख्या अनेक प्रकारात मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होत आहे व त्यात भाविष्यात वाढच होत राहणार आहे. मुद्रित साहित्याची मोठ्या प्रमाणावर होणारी वाढ समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीचे लक्षण आहे. ही वाढ जितकी मोठी तितकी मुद्रीतशोधकांची आवश्यकता अधिक असते ,म्हणून मुद्रीतशोधकांची स्वरूप समजावून घेणे गरजेचे आहे.

स्वरूप :

मुद्रितशोधन -> लेखकांकडून प्रमाण लेखनात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखन निर्दोष करणे म्हणजे मुद्रितशोधन होय.

मुद्रितशोधक -> व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक दूर करण्याचे काम करणारी व्यक्ती म्हणजे 'मुद्रितशोधक ' होय.

मुद्रीतशोधानासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये :

१) मुद्रीतशोधकाला भाषेची उत्तम जाण असणे गरजेचे आहे.

२) मुद्रीतशोधकाला मुद्रणविषयक तंत्र ,परिपूर्ण ज्ञान व दृष्टी आवश्यक असते.

३) आपले ज्ञान आद्ययावत ठेवणे गरजेचे असते.

४) कामावरील निष्टा ,अनेक विषयांसह समोर आलेल्या मजकुरात रुची व जाण असणे आवश्यक आहे.

५) कामाचा प्रदीर्घ अनुभव मुद्रीतशोधकाला अधिकाधिक परिपूर्ण आणि प्रगल्भ करत असतो .

६) सक्षम मुद्रितशोधक होण्यासाठी चिकाटी ,अभ्यासातील सातत्य व सराव आवश्यक असतो .

७) अनेक विषयांची आवड व समज असणे आवश्यक असते.