मुठा खोरे हे मुठा नदीच्या उगमापासून पुढील काही भागात वसलेले आहे. मुठा खोरे हे शिवकाळातील बारा मावळातील एक मावळ आहे. शिवकालीन पत्रात मुठा खोऱ्याचा बऱ्याच वेळा उल्लेख आलेला आहे. पुण्याच्या नैऋत्य दिशेने वाहत येणारी ही पुण्याची जीवनगंगा मुळशी तालुक्यात वेगरे या गावी उगम पावते आणि खाली वाहत येऊन सांगरून डावजे या गावाजवळ तिला मोशी आणि आंबी या तिच्या दोन उपनद्या मिळतात. मुठा खोऱ्यात ऐकून १९ गावे आहेत. वेगरे, भोडे, वेडे, आंदगाव, लव्हर्डे, कोळवडे, खारवडे, माळेगाव, मुठा, भरेकरवाडी, दिघेवाडी, जातेडे, कोंधूर, बहुली ही त्यातील काही गावे होत. बहुलीच्या पुढे कर्यात मावळ सुरू होते. मुठा खोऱ्याची देशमुखी मारणे देशमुख या ऐतिहासिक घराण्याला होती.त्यांंचा किताब गंभीरराव हा आहे.[ संदर्भ हवा ]

भौगोलिक तपशीलसंपादन करा

  • समविष्ट तालुके, गावे -parts of Mulshi taluka
  • क्षेत्रफळ ----
  • जमा होणारे एकूण पाणी -

जल व्यवस्थापनसंपादन करा

  • धरणे -टेमघर
  • बंधारे - मारणेवाडी, आंबेगाव
  • तलाव -

संदर्भसंपादन करा


कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.