मुख्य उपनिषदे
हिंदू धर्मातील सर्वाधिक प्राचीन आणि सर्वाधिक अभ्यासल्या गेलेल्या निवडक उपनिषदांना ‘मुख्य उपनिषदे’ असे म्हणतात. यांची रचना इसवी सन पूर्व आठशे ते इसवी सनाच्या आरंभापर्यंत झाली असावी. या उपनिषदांचा वैदिक परंपरेशी संबंध आहे. वासाहतिक काळातील भारतविदांनी खालील दहा उपनिषदे मुख्य उपनिषदे मानलेली आहेत.
- ईश, यजुर्वेद
- केन, सामवेद
- कठ, यजुर्वेद
- प्रश्न, अथर्ववेद
- मुंडक, अथर्ववेद
- मांडूक्य, अथर्ववेद
- तैत्तिरीय, यजुर्वेद
- ऐतरेय, ऋग्वेद
- छांदोग्य, सामवेद
- बृहदारण्यक, यजुर्वेद
वेदांताच्या प्रमुख संप्रदायांच्या संस्थापकांनी (उदा. आदि शंकर आणि मध्वाचार्य) या दहा मुख्य उपनिषदांवर भाष्ये लिहिलेली आहेत.
भाषांतरे आणि अन्य ग्रंथ
संपादन- द प्रिन्सिपल उपनिषद्स (१९५३) - सर्वपल्ली राधाकृष्णन. या पुस्तकात एकूण १८ उपनिषदांचे इंग्रजी भाषांतर दिलेले आहे. यात ह्यूमच्या (१९२१) तेरा उपनिषदांसह सुबाल, जाबाल, पैंगल, कैवल्य, वज्रसूचिका (मुक्तिका क्रमांक ३०, १२, ५९, १२ व ३६) यांचा समावेश आहे.
- सिक्स्टी उपनिषद्स ऑफ द वेदा वॉल्यूम १ - पॉल ड्युसेन. मोतीलाल बनारसीदास.
- द थर्टीन प्रिन्सिपल उपनिषद्स – ह्यूम, रॉबर्ट अर्नेस्ट (१९२१). ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस.
- द मुख्य उपनिषद्स (२०१४) [१९२०-१९३१] – जॉन्स्टन, चार्ल्स. क्षेत्र बुक्स.
बाह्य दुवे
संपादनहोली बुक्स या संकेतस्थळावर दहा मुख्य उपनिषदांची पीडीएफ संचिका आहे. दुवा : https://holybooks-lichtenbergpress.netdna-ssl.com/wp-content/uploads/The-Ten-Principal-Upanishads.pdf[permanent dead link]