मीना प्रभू

मराठी लेखिका
(मीना प्रभु या पानावरून पुनर्निर्देशित)

डॉ. मीना सुधाकर प्रभू (? - हयात) या एक डॉक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचा जन्म आणि शिक्षण पुणे शहरात झाले. पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम.बी.बी.एस. केले. त्यानंतर मुंबईला जाऊन त्या डी.जी.ओ. झाल्या. १९६६ मध्ये लग्न झाल्यानंतर त्या इंग्लंडमध्ये आल्या. त्यांनी सुमारे वीस वर्षे लंडनमध्ये भूलतज्ज्ञ आणि जनरल प्रॅक्टिशनर म्हणून काम केले.

मीना प्रभू
जन्म ?
कार्यक्षेत्र वैद्यक, साहित्य
भाषा मराठी
विषय प्रवासवर्णन

प्रभू यांनी जगातल्या अनेक देशांत प्रवास करून प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांच्या आर्किटेक्ट पतीने यासाठी त्यांना उत्तेजन तर दिलेच, शिवाय पुरेसे आर्थिक पाठबळ दिले.[ संदर्भ हवा ] जेव्हा त्या प्रवास करीत नसतात, तेव्हा त्या लंडनमध्ये असतात.

प्रभू यांचे अनेक लेख मराठी वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांमधून प्रकाशित झाले आहेत.

प्रकाशित साहित्य

संपादन
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अपूर्वरंग (भाग १, २, ३, ४) प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
इजिप्तायन प्रवासवर्णन मौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन २००५
उत्तरोत्तर प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन २०१७
गाथा इराणी प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन २००८
ग्रीकांजली प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
चिनी माती प्रवासवर्णन मौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन २००३
डायना आणि चार्ल्स चरित्र? मेहता प्रकाशन
तुर्कनामा प्रवासवर्णन मौज प्रकाशन
दक्षिणरंग प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
न्यू यॉर्क प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन २०१४
माझं लंडन प्रवासवर्णन मौज प्रकाशन/पुरंदरे प्रकाशन
मेक्सिकोपर्व प्रवासवर्णन मौज प्रकाशन २००१
रोमराज्य -१ प्रवासवर्णन मौज प्रकाशन
रोमराज्य - २ प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
वाट तिबेटची प्रवासवर्णन पुरंदरे प्रकाशन
सुखनिधी तुझा माझा काव्य पद्मगंधा प्रकाशन