मिशेल तेमेर
मिशेल मिगेल इलायास तेमेर लुलिया (२३ सप्टेंबर, इ.स. १९४०:तियेते, ब्राझील - ) हे ब्राझीलचे उपराष्ट्राध्यक्ष आणि काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष आहेत.
राष्ट्राध्यक्ष दिल्मा रुसेफ यांच्यावर खटला भरला गेल्याने रुसेफ यांना निलंबित केले गेल्यावर तेमेर यांनी १२ मे, २०१६ रोजी काळजीवाहू राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.