मिराई चॅटर्जी
मिराई चटर्जी या भारतीय समाजसेविका आहेत. त्या सेवा (SEWA) या अहमदाबाद येथील महिलांच्या स्वयंरोजगार संघटनेचे काम करतात.राष्ट्रीय सल्लागार समितीच्या सदस्या म्हणून जून २०१० मध्ये त्यांची नियुक्ती झाली आहे. गेली ३० वर्षे भारतातील अनौपचारिक क्षेत्रातील स्त्रियांचे आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता सुधारण्याच्या दृष्टीने त्या कार्यरत आहेत.लिंगसमभाव,शिक्षण आणि स्वच्छता याचे महत्त्व समाजाला समजावून सांगण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे.[१]
मिराई चटर्जी | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
प्रशिक्षणसंस्था | जोन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ,हार्वर्ड विद्यापीठ |
पेशा | समाजसेविका |
धर्म | हिंदू |
कामाचे स्वरूप
संपादनसेवा या संस्थेच्या आरोग्य विभाग,बाल कल्याण विभाग या कामांची जबाबदारी मिराई यांच्यावर आहे. लोकस्वास्थ्यसेवा या समाजाच्या आरोग्यासंबंधी काम करणाऱ्या संस्थेच्या त्या संस्थापिका आहेत. National Insurance VimoSEWA Cooperative Ltd या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. सेवा या संस्थेत त्या १९८४ साली कार्यवाह म्हणून रुजू झाल्या.
शिक्षण
संपादनत्यांनी मिराई यांनी हार्वर्ड विद्यापीठातून इतिहास आणि विज्ञान या विषयात पदवी संपादन केली असून जोन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.[२]
सेवा संस्थेविषयी
संपादनतळागाळातील महिलांनी सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली नेता बनावे यादृष्टीने त्यांना विकसित करणे हे ‘सेवा’च्या महत्त्वपूर्ण योगदानांपैकी एक आहे.स्थानिक महिला नेत्या आपापल्या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या संस्था चालवून ‘सेवा’ चळवळ देशभरात पोचवीत आहेत.[३]
पदभार
संपादनFriends of Women's World Banking (FWWB), National Commission for Enterprises in the Unorganized Sector, National Rural Health Mission. या संस्थांमध्ये त्यांनी पद भूषविले आहे तसेच World Health Organization’sच्या सामाजिक आरोग्य विभागाची धुराही त्यांनी सांभाळली आहे. Public Health Foundation of India (PHFI) या भारतीय संस्थेत त्यांनी अधिकारी म्हणून काम केले आहे.[४]
- ^ http://economictimes.indiatimes.com/news/politics/nation/New-hands-aboard-National-Advisory-Council-ready-for-biz/articleshow/5992527.cms https://query.nytimes.com/gst/fullpage.html?res=9C05E1D9143FF933A05752C0A9619C8B63
- ^ किडवाई नैना, अनुवादक गजेंंद्रगडकर वर्षा,३०सामर्थ्यशाली स्रिया,सकाळ प्रकाशन,२०१६,पृृष्ठ १९०ते १९९
- ^ किडवाई नैना,अनुवादक गजेंंद्रगडकर वर्षा,३०सामर्थ्यशाली स्रिया,सकाळ प्रकाशन,२०१६,पृृष्ठ१९५
- ^ Mirai Chatterjee: Commissioner from India WHO website.