माहुली किल्ला

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात आसनगाव जवळ वसलेला हा सुंदर किल्ला आहे...

शिवाजी महाराजांवर याच किल्ल्यावर गर्भ संस्कार झाले..

त्यावेळच्या अडचणी लक्षात घेता शहाजी राजेंनी जिजाऊंना त्वरित शिवनेरीवर हलविले..

अतिशय देखणा असा हा माहुली किल्ला.. गिर्यारोहासाठी अनेक गिर्यारोहक इथे येतात.. आकर्षित करणारी अनेक ठिकाणे या किल्ल्यावर आहेत..पायथ्याचे प्राचीन गणेश मंदिर, किल्ल्यावरचा महादरवाजा , दरवाज्यालागत असलेल्या गुहा , मागील वर्षी "कुणबी प्रतिष्ठाण वासिंद" यांच्या तर्फे किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली..

"शिवदुर्ग प्रतिष्ठाण" च्या अंतर्गत माहुलीगडावरील महादरवाजा आणि परिसर, हनुमान दरवाजा आणि परिसर, माहुलेश्वर मंदिर आणि परिसरातील ऐतिहासिक वास्तू तसेच धान्यकोठार इ. ठिकाणी स्वच्छता, जतन आणि संवर्धनाचे काम चालू आहे. "शिवदुर्ग प्रतिष्ठाण" अंतर्गत माहुलीगडावर "स्वछता अभियान" तसेच "व्यसनमुक्त माहुलीगड अभियान" हे कार्यक्रम राबवले जातात.

माहुली चंदेरी,भंडारगड,माहुली व पळस गड हे मिळून हा किल्ला आहे.. किल्ल्यावर चढताना काही ठिकाणी पाण्याचे टाके दिसतात .. अतिशय कडक उह्नात सुद्धा यावर थंड पाणी मिळते..

माहुलीवर प्राचीन शिवमंदिर अजूनही आहे.. कल्याण दरवाजा,हनुमान दरवाजा ,खिंड तसेच अनेक प्राचीन शिल्प, पायऱ्या या गोष्टी सर्वाना आकर्षित करतात..

कसे जाल?:

मध्य रेल्वे चे आसनगाव स्थानकावरून थेट रिक्षा करून जावं लागत.

शहापूर ST डेपो मधून सकाळी माहुली गावासाठी बस सुटते.. हि बस माहुली गावाजवळ सोडते तिथून काही अंतर चालत जावे लागते..

मुंबकडून येणारे NH3 वरून आसनगाव जवळून मानस मंदिर रोड ला डावीकडे वळून सरळ किल्ल्याकडे जावे.

नाशिक वरून येणार्यांना सुद्धा हाच मार्ग आहे..

सोबत पाणी घेऊन जाणे 2 लिटर एक माणसी .. (महादरवजाच्या जवळचे पाणी सुद्धा पिण्यालायक आहे)

खाण्याची सुविधा पायथ्याशी आहे.. छोटे हॉटेल आहेत.. घरचा डब्बा उत्तम ठरेल..

टीप: अजून माहिती साठी अकाउंट वर संदेश सोडा @अक्षयहरड