माळ हा गळ्यात घालायचा एक दागिना आहे. हा दागिना सहसा स्त्रीया घालतात. एका सूत्रात ओवलेले मणी हे माळेचे मूळ स्वरूप आहे. पूर्वी माळेला एकावली असे म्हणत. एकपदरी टपोऱ्या मोत्यंची माळ. कालिदासाने 'लातावीत्पे एकावली लग्ना ' असा या अलंकाराचा उल्लेख विक्रमोर्वाशीयात केला आहे.[]माळ ही सहसा मोत्यांची असते.पण माळेचे मोहन माळ, बोरमाळ, इ. अनेक प्रकार आहेत हे सोन्याच्या मण्यामध्ये असतात. माळेमध्ये वेगवेगळ्या कलाकृती करता येतात. माळ ही शोभेची व किमान प्रतिष्ठेची बाब मानली जाते. सोन्याच्या, चांदीच्या माळेमध्ये मोती घालूनही माळ बनवली जाते.मोत्याच्या एकरी सरला यष्टीलता किवा यष्टिका म्हणत.कालिदासाने मोत्यांच्या यष्टीचा पुढील प्रमाणे उल्लेख केला आहे- क्वचीत्प्रभालेपीभीरीन्द्रनीलैमुक्तामयी यष्टीरिवानुवीद्धा ।।[]

पुरुषही माळ घालू शकतात.

संदर्भ

संपादन
  1. ^ भारतीय संस्कृती कोष खंड दुसरा
  2. ^ भारतीय संस्कृती कोष खंड दुसरा