माळशिरस भुलेश्वर
माळशिरस भुलेश्वर हे पुरंदर तालुक्याच्या सींमेवरील गाव असून यादवकालीन भुलेश्वर मंदिर प्रेक्षणीय आहे. पुण्यापासून पन्नास किलोमीटर अंतरावर असून सहा हजार लोकसंख्या आहे.पत्रकार कवीदशरथ यादव यांचे हे मूळगाव असून तालुक्यातील क्षेत्रफळाने मोठे गाव आहे. माळशिरस गावाला प्राचीन परंपरा असून, पुणे सोलापूर महामागाने यवत पासून गावाला जाण्यासाठी रस्ता असून येथे शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक पुस्तकात माळशिरस व भुलेश्वराबाबतचा सविस्तर इतिहास आहे. पुरंदर तालुक्यातील सीमेने मोठे असणारे हे गाव आहे.