मालपुआ रबडी
मालपुआ रबडी हा एक गोड खाद्यपदार्थ आहे. मालपुआ व रबडी या दोन पदार्थाना एकत्र केल्यावर जे मिष्टान्न तयार होते त्याला मालपुआ रबडी असे म्हणले जाते.[१]
मालपुआ साहित्य
संपादन१ वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक, पाव वाटी बारीक रवा, पाव लिटर दूध, ४ चमचे पिठीसाखर, अर्धा चमचा वेलची पूड, बदामाचे काप आवश्क्तेनुसार, तेल किवा तूप.[२]
रबडी साहित्य
संपादन१ लिटर फॅट दूध, अर्धी वाटी साखर, २ थेंब केवडा इंसेन्स, वेलची पूड, गुलाब पाकळ्या.
कृती
संपादनरवा, मैदा, कणीक, व पिठीसाखर एकत्र करा. दूध घालून घट्टसर भिजवा. २-३ तास झाकून ठेवा. खोलगट तव्यावर किवां नॉन स्टिक पॅनवर तूप लावून त्यावर तयार मिश्रण १ डावभर घाला. तूप सोडून दोन्ही बाजूंनी बदामी रंगावर मालपुवे भाजावे. दुध आटवून पाव लिटर राहील एवढे करा. त्यात साखर, बदाम काप, काजू, पिस्ता पण घाला. वेलची व इंसेन्स घाला. तयार मालपुव्यावार रबडी घालून गुलाब पाकळ्या घालून सजवा
संदर्भ
संपादन- ^ "Malpua With Kesar Rabdi | Holi Special Recipe | The Foodie | Home Chef Recipe". www.timesnownews.com (इंग्रजी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.
- ^ Hindi, Lifeberrys; Lifeberrys (2020-05-27). "लॉकडाउन रेसिपी : मीठे में ट्राई करें रबड़ी मालपुआ, हो जाएंगे इसके स्वाद के दिवाने". lifeberrys (हिंदी भाषेत). 2021-05-30 रोजी पाहिले.