मायाळू (शास्त्रीय नाव: Basella alba, बसेला अल्बा ; इंग्लिश: Malabar spinach, मलबार स्पिनाच ;) ही उष्ण कटिबंधात आढळणारी वेल आहे. पालेभाजीच्या स्वरूपात हिचा खाद्यपदार्थ म्हणून वापर होतो. भारताबाहेर चिनी, फिलिपिनो , व्हिएतनामी व सिंहला समाजांत ही पालेभाजी खाल्ली जाते. याच्या पानांमधे लोह्, कॅल्शियम्, अ आणि क जीवनसत्त्व अधिक प्रमाणात आढळतात्. या पानांमध्ये उष्मांक कमी असून त्यामानाने प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यात रक्तात विरघळणारे तंतू पुष्कळ प्रमाणात असतात.

मायाळूची पाने

उष्ण्, दमट हवामान व पाण्याचा निच‍रा असलेल्या जमिनीत याची वाढ झपाट्याने होते. थंड व कोरड्या हवामानात वाढ तितकी चांगली होत नाही. याची लागवड बियांपासून तसेच जाडसर देठ रोवून करता येते.

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "डेटाबेस.प्रोटा.ऑर्ग - मायाळू" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)