मायणी हे खटाव तालु़क्यातील गाव आहे. हे तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. येथे तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. हे एक व्यापारी केंद्र आहे.

भौगोलिक माहिती

संपादन

तालुका - खटाव जिल्हा - सातारा क्षेत्रफळ - ३८६० हेक्टर लोकसंख्या 15570 (2019 अंदाजेच्या जनगणनेनुसार) तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मायणी या गावातून चांद नदी वाहते. या गावातून मिरज-भिगवण (प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग) व पंढरपूर-मल्हारपेठ हे दोन राज्य महामार्ग जातात. हे महामार्ग गावातल्या चांदणी चौकातून जातात.

हवामान

संपादन

येथे ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान ११ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून ते सप्टेंबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. एप्रिल ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.

ऐतिहासिक माहिती

संपादन

मायणी हे गाव ऐतिहासिक आहे, तसेच पर्यटन स्थळ सुद्धा आहे.

या गावामध्ये यशवंतबाबा व सिद्धनाथाची , सरुताईची यात्रा भरते. गावात इसवी सनाच्या १३ व्या शतकात यादवकालीन राजा सिंघण याने बांधलेले हेमाडपंथी स्वरूपाचे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. येथील मातोश्री सरुताईंचा मठ प्रसिद्ध आहे.

मायणी सर्व सोयीयुक्त असून मध्यम स्वरूपाचे शहर आहे.भविष्यामध्ये मोठ्या स्वरूपाचे शहर म्हणून नावारूपास येईल.

मायणी पक्षी अभयारण्य

संपादन
हे गाव पक्षी अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. गावापासून २ कि.मी. अंतरावर ब्रिटिशकालीन तलाव आहे. येथे अनेक पाणपक्षी दिसतात. तसेच स्थलांतरित पक्षीही येतात.स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये रोहित पक्ष्यांचे थवे हे विशेष आकर्षण असते. त्याशिवाय चक्रवाक, पट्टकदंब, हळद-कुंकू ही बदकेही आढळतात. कापशी घार, गरुड, दलदल ससाणा असे शिकारी पक्षी देखील येथे आहेत.नदी सूर्य, खंड्या, कवड्या,राखी बगळा, वंचक, चित्रबलाक असे पाणपक्षी सुद्धा आढळतात. पक्षी निरीक्षणासाठी वनविभागाने येथे दोन मनोरे उभारले आहेत.*मायणीचा 125 वर्षाचा तलाव व याठिकाणचा निसर्ग मायणीकरना मिळालेला अनोखा ऐतिहासिक ठेवा*
      मायणी या संवेदनशील गावात ब्रिटिश कालीन तलाव व पक्षी आश्रयस्थान या ऐतिहासिक निसर्ग संपदेचा परिसर अनेक ठेव्यानी भरलेला आहे . ही अद्यावत माहिती जुलै 2020ची आहे. या ठिकाणी भलामोठा तलाव, बगीचा ,पक्षी पाहणीचे चार टॉवर, पक्षी पाहणी छोटे चेंबर ,जुने तलावाच्या पाण्यात असणारे मारुती मंदिर ,जकवेल ,कालवा, पाणी कालव्यात वळवण्यासाठीची अनोखी रचना ,त्याठिकाणी बनलेला तांत्रिक धबधबा , अनेक वर्षांची साक्ष देणारी भलेमोठे वृक्ष, त्यावर दिवसरात्र लटकणारे शेकडो वटवाघूळे ,जुनी रोपवाटिका परिसर, 1984ची राहण्याची वसाहत ,कास पठारासारखी प्ररिकृती असलेला सुंदर परिसर, व अनेक प्रजातींचे पक्षी ,नवीन बगीचा, रोपवाटिका,असा अनेक बाबींचा ठेवा आपणास याठिकाणी पहावयास मिळतो. आणि हा ठेवा जपण्यासाठी मायणीतील पत्रकार दत्ता कोळी यांनी मायणीतील युवकांना विविध संस्थांना सोबत घेऊन वनविभाग संगोपनाचे काम अथक प्रयत्नातून करून पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहे.....

वैद्यकीय सेवा

संपादन

मायणी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र ,मेडिकल कॉलेज व पशुवैद्यकीय दवाखाना आहे.

प्रारूप प्रादेशिक विकास योजना २०१६-२०३६ अंतर्गत सातारा जिल्ह्यातील १० मोठ्या गावांचा म्हणजेच १०,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या १० गावांचा समावेश झाला आहे. त्यांमध्ये खटाव तालुक्यातील मायणी या एकमेव गावाची निवड करण्यात आली आहे.

वाहतुकीच्या सोयी

संपादन
  • जवळचे बस स्थानक - मायणी बसस्थानक
  • जवळचे रेल्वे स्थानक - कराड,सातारा
  • जवळचा विमानतळ - कराड,कोल्हापूर
  • जवळचे मोठे शहर - वडूज,विटा-सांगली,

शैक्षणिक संस्था

संपादन

प्राथमिक शाळा -.......

  • जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा .
  • जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा
  • भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल
  • ब्लाॅसम स्कूल
  • हुतात्मा भगतसिंग विद्यामंदिर.

माध्यमिक शाळा -

  • भारतमाता विद्यालय
  • भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल
  • वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशाला
  • अनंत इंग्लिश स्कूल.

महाविद्यालये -

  • भारतमाता जुनियर काॅलेज
  • कला-वाणिज्य महाविद्यालय
  • काॅलेज ऑफ फार्मसी
  • मेडिकल काॅलेज.