मानसशास्त्रातील नवसंकल्पना

Artificial intelligence कृत्रिम बुद्धिमत्ता- मानवी बुद्धी सारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमत
 मानवी वर्तनाचा शास्त्रीय रितीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय.मानसशास्त्रात मानवी वर्तन निर्धारित करणा-या सर्व घटकांचा सखोल अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ - मज्जासंस्था, [अंतःस्त्रावी ग्रंथी], अध्ययन प्रक्रिया, प्रेरणा,भावना,विविध मानसिक प्रक्रिया इत्यादी.वेगवेगळया प्रकारची संशोधने मानसशास्त्रात सतत होत असतात. यातूनच नवनवीन शाखा व संकल्पना उदयास येतात. यातील काही नवसंकल्पना व शाखा पुढीलप्रमाणे.[१]

सकारात्मक मानसशास्त्रसंपादन करा

(पॉजीटीव्ह सायकॉलॉजी) मार्टीन सेलिंग्मन (२०००) यांनी पॉ‍जिटीव्ह सायकॉलॉजी अर्थात सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची नवीन शाखा निर्माण केली. सकारात्मक दृष्टीकोण, सकारात्मक भावना, सकारात्मक विचार यांचा व्यक्तींवर, त्यांच्या कार्यावर, वर्तनावर, स्वास्थावर काय परिणाम होतो याचा अभ्यास या शाखेत केला जातो. सकारात्मक मानसशास्त्राचे मुख्य ध्येय म्हणजे मनुष्यातील नकारात्मक विचार काढून टाकून नवीन सकारात्मक विचारांची रूजवणूक करणे होय. व्यक्तीमध्ये धनात्मक गुणांची जोपासना करण्यावर सकारात्मक मानसशास्त्रात भर दिला जातो.

सकारात्मक मानसशास्त्राचा अर्थ

   पीटरसन 2008 यांनी असे मत व्यक्त केले की, सकारात्मक मानसशास्त्र ही नव्याने उगम पावलेली मानसशास्त्राची शाखा आहे. सकारात्मक मानसशास्त्रात जीवनाकडे चांगल्याप्रकारे बघण्याचा शास्त्रीय दृष्टिकोनाचा अभ्यास केला जातो. यामधून दुर्बल नकारात्मक गुणांपेक्षा चांगल्या गुणांचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला जातो. सकारात्मक मानसशास्त्र मानवाचा स्वरूपा बद्दलची नकारात्मक प्रतिमा पुसून अधिक संतुलित प्रतिमा बनविण्याच्या दिशेने काम करते. मार्टिन सेलिगमन यांनी 1998 मध्ये अमेरिकन मानसशास्त्रीय संघटनेच्या परिषदेमध्ये मुख्य विषय म्हणून सकारात्मक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपशाखा अधिकृतरित्या जाहीर केली. मानवाच्या ऋणात्मक गुणधर्मा बरोबरच त्यांच्या धनात्मक गुणधर्मांचाही अभ्यास झाला पाहिजे. असा आग्रह सेलिग्मन यांनी धरला. त्यामुळे या शाखेमध्ये ताण, चिंता,आजारपण विकृती, संघर्ष, वैफल्य यांच्या अभ्यासापेक्षा आनंद, धैर्य, सुख, समाधान या घटकांच्या अभ्यासावर भर दिला जाऊ लागला.
  सकारात्मक मानसशास्त्राची सर्वमान्य व सर्वव्यापक अशी व्याख्या नाही. ही सेलिग्मन यांच्या मते सकारात्मक मानसशास्त्र हे मानवाच्या वैयक्तिक शारीरिक नातेसंबंध विषयक, संस्था विषयक, संस्कृती व जागतिक पातळीवरील बहुमुखी कार्यकर्तृत्वाचा व भरभराटीचा शास्त्रीय अभ्यास करणारी शाखा आहे. यावरून थोडक्यात व्याख्या अशी केली जाते की 'सकारात्मक मानसशास्त्र हे सुख व मानवी सामर्थ्याचे त्यांच्या वाढीचे शास्त्र आहे'
 • सकारात्मक मानसशास्त्रचे स्वरूप व महत्त्व
     सकारात्मक वर्तनाच्या तुलनेत मानवाच्या नकारात्मक वर्तन प्रणाली वरच जास्त भर देण्यात आलेला आहे. असे संशोधनातून दिसून आले आहे. नकारात्मक घटक त्यांच्या प्रभावामुळे आपले लक्ष वेधून येतात व सकारात्मक घटक दुर्लक्षित राहतात उदाहरणार्थ -एखाद्या व्यक्तीचा राग लगेच दिसून येतो परंतु त्याची गुणवत्ता बुद्धिमत्ता दिसून येत नाही. अभ्यासातून असे ठळकपणे दिसते की एक नकारात्मक गुण चांगुलपणाची कोणतीही क्रिया नाहीशी करू शकते. एक वाईट व्यवहार व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवतो. सकारात्मक मानसशास्त्र याविषयी लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करू शकते. अनेक माणसे शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की व्यक्ती सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून मानसिक समस्यांवर मात करू शकेल. त्यामुळे सकारात्मक मानसशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे शास्त्र आहे.

शून्याच्या वरील जीवन

         शून्याच्या वरच्या बाजूला असलेल्या जीवनाचा अभ्यास सकारात्मक माणूस शास्त्रात केला जातो त्या ठिकाणी शून्य आहे तेथे एक सीमारेषा आहे जी आजारपण व आरोग्य यात विभाजन करून त्यांना वेगळे करते पारंपारिक मानसशास्त्र शून्य स्थानावर असलेल्या व शून्य पेक्षा कमी असलेल्या जीवनावर म्हणजेच वेदना व वैफल्य यावर अधिक लक्ष देते
    शून्याच्या खालचे जीवन म्हणजे असे जीवन ज्यात ताणतणाव, जीवनातील संघर्ष, शारीरिक मानसिक आजार, आरोग्य सामाजिक संबंध, हे घटक कि जे जीवनावर वाईट परिणाम करतात. शून्याच्या वरच्या बाजूस असलेले गुणधर्म धनात्मक स्वरूपाच्या आहेत तर शून्याच्या खालील बाजूस असलेले गुणधर्म ऋणात्मक स्वरूपाच्या आहेत.अशा प्रकारे शून्याच्या वरच्या बाजूस धन विचलन तर शून्याच्या खालील बाजूस करून विचलन दिसते. शून्याच्या जवळ म्हणजेच 

-1ते+1 यादरम्यान तटस्थ गुणधर्म असतात.

बोधनिक मानसशास्त्रसंपादन करा

(कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी) मानसशास्त्रात मानवी वर्तन आणि त्याच्या मागे असणा-या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. बोधनिक मानसशास्त्र या मानसशास्त्राच्या शाखेत मानसिक प्रक्रियांचा अभ्यास केला जातो. त्यावर संशोधने केली जातात. संवेदन स्मृती, विचार प्रक्रिया, बुद्धिमत्ता, समस्या परिहार, भाषा शिकणे, निर्णय प्रक्रिया, सृजनशीलता या सर्व प्रक्रियांना बोधनिक किंवा मानसिक प्रक्रिया असे म्हटले जाते. या प्रक्रिया मेंदूशी निगडित आहेत. त्यामुळे बोधनिक मानसशास्त्रात मानसिक प्रक्रियांचा आणि पर्यायाने मेंदूच्या कार्याचा अभ्यास केला जातो.

भावनिक बुद्धिमत्तासंपादन करा

(इमोशनल इंटेलिजन्स)- भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना १९९५ मध्ये डॅनियल गोलमन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानी मांडली. त्यांचे 'इमोशनल इंटेलिजन्स' हे पुस्तक खूप गाजले.

	मानवी जीवनात भावनांचे अधिष्ठान कायमच अबाधित राहिले आहे. आपल्या भावनाद्वारेच आपले वर्तन बऱ्याच वेळेस निर्धारित होत असते. या सूत्राचा आधार घेऊनच गोलमन यांनी 'भावनिक बुद्धिमत्ता' ही संकल्पना मांडली. बुद्धिमत्तेच्या इतर प्रकारापेक्षा भावनिक बुद्धिमत्ता हा प्रकार काहीसा वेगळा आहे. गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्तेचे पाच घटक सांगितले आहेत.

१. स्वतःच्‍या भावना समजावून घेणे. २. स्वतःच्या भावनावर नियंत्रण ठेवणे. ३. स्वतःच्या भावना योग्य मार्गांनी व्यक्त करणे. ४. दुस-यांच्या भावना समजावून घेणे. ५. भावनांचा उपयोग कार्याला प्रेरणा देण्यासाठी करणे.

	ज्या व्यक्तीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता चांगली असते ती व्यक्ती नातेसंबंध व्यवस्थित हाताळू शकते. यशामध्ये बुद्धिमत्तेचा वाटा २५टक्के असतो तर भावनिक बुद्धिमत्तेचा ७५ टक्के. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच इमोशनल इंटेलिजन्स इमोशनल कोशंट मध्ये (इकयू) मोजली जाते. कॉमन सेन्स, समज, शहाणपण, सकारात्मक वृत्ती, प्रगल्भता, नैतिकता, आत्मविश्वास, संयम, चिकाटी, सहिष्णुता, लवचिकता हे सारे व्यक्तिमत्त्वाचे पैलू परस्परसंबंधित असतात. त्याचा मूळ स्रोत भावनिक बुद्धिमत्ता हाच असतो.
 • -उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये:-

1. भावनिक दृष्ट्या स्थिर व संयमी 2. आशावादी स्वावलंबी 3. आनंदी व उत्साही 4. शांत, समाधानी

 • निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

1. भावनिक दृष्ट्या अस्थिर व असंयमी 2. निराशावादी व परावलंबी 3. दुःखी व उदासीन 4. हो शांत व समाधानी

जॉन मेयर आणि पीटर सँलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी 'भावनिक बुद्धिमत्ता' या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. डॅनियल गोलमन 1995 यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेत मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. भावनिक बुद्धिमत्ता

* जॉन मेयर आणि पीटर सँलोव्ही यांची व्याख्या-

"स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता भावना मधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तन यांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय"

 • भावनिक बुद्धिमत्तेचे समावेश होणाऱ्या बोधनी क्षमतांचा संच

1. भावनांची झाली होण्याची क्षमता-

          स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थ विवरण करता येणे.

2. भावना उपयोगात आणण्याची क्षमता-

           विचार करणे आणि समस्या सोडविणे या बोधनिक कार्याकरिता भावनांचे संबंधित माहिती उपयोगात आणता येणे.

3. भावना समजावून घेण्याची क्षमता-

           भावनिक भाषा लक्षात घेता येणे आणि विविध भावना मधील संबंधांचे आकलन करून घेता येणे.

4. भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता- स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करता येणे.

इकॉलॉजिकल इंटेलिजन्ससंपादन करा

'इकॉलॉजिक इंटेलिजन्स' ही संकल्पना देखील डॅनियल गोलमन यांनीच मांडली. पर्यावरणाच भान असण म्हणजे इकॉलॉजिक इंटेलिजन्स होय. या संकल्पनेत माणसामुळे सभोवतालच्या पर्यावरणावर होणा-या दुष्परिणामांचे आकलन आणि ते कमी करण्यासाठी काय करायला हवं आहे त्याचे मार्ग शोधणे असा अर्थ यात अध्याह्रत आहे.

माईंडफुलनेससंपादन करा

माईंडफुलनेस ही एक मानसशास्त्रीय प्रक्रिया आहे. ज्यात सद्य क्षणी व्यक्ती जे आंतरिक आणि बाहय अनुभव घेते त्याच्या जाणीवेचा अंतर्भाव होतो. माईंडफुलनेस मुळे प्रत्येक क्षणाचा रस-रसुन उपभोग घेण्याची क्षमता व्यक्तीमध्ये निर्माण होते. ध्यानधारणा किंवा इतर काही प्रशिक्षण तंत्राच्याद्वारे माईंडफुलनेस प्रक्रिया व्यक्तीमध्ये निर्माण करता येते. माईंडफुलनेसमुळे व्यक्तीची मानसिक सुस्थिती सुधारण्यास मदत होते.

संदर्भसंपादन करा

 1. ^ मानसशास्त्रातील नवसंकल्पना डॉ.एस.डी. पाटणकर दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर