मानवी पॅपिलोमा विषाणू
मानवी पॅपिलोमा विषाणू हा मानवामध्ये लैंगिक रित्या मानवी पॅपिलोमा विषाणू संसर्ग पसरवणारा विषाणू आहे.हा एक डीएनए विषाणू आहे. साधारणपणे ९०% संसर्गांमध्ये लक्षणे आढळून येत नाहीत (minor symptoms)तसेच २ वर्षांत त्याचे निराकरण होऊ शकते. काही वेळा लक्षणे गंभीर स्वरूप प्राप्त करू शकतात.त्यांचे रूपांतर अतिगंभीर आजारात वा कर्करोगात होऊ शकते. संसर्ग कुठे झाला आहे यानुरूप हा कर्करोग तोंड, योनी, शिश्न, सर्व्हिक्स इत्यादी ठिकाणी होऊ शकतो. आतापर्यंत या विषाणूचे १७० प्रकार ओळखले व अभ्यासले गेले आहेत. त्यापैकी ४० प्रकार हे लैंगिक संसर्गांसाठी कारणीभूत आहेत. मुख्यत्वे असुरक्षित लैंगिक संबंध, धूम्रपान,कमकुवत रोगप्रतिकार शक्ती ही संसर्गाची कारणे आहेत. गर्भातील बाळाला आईकडून या आजाराचे संक्रमण होऊ शकते.सामान्य सॅनिटाइजर किंवा जंतूनाशक या विषाणूला नष्ट करू शकत नाही त्यामुळे कुठल्याही पृष्ठभागावर, त्वचेवर असल्यास व त्याच्याशी संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. एका वेळी वेगवेगळ्या प्रकारचे (स्ट्रेन) संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये आढळू शकतात.