मादीची जननेंद्रिये

मानवी स्त्रीच्या प्रणयक्रीडा, संभोगात आणि प्रजनन क्रियेत (संस्कृत:) उल्वा (लॅटीन भाषा:वुल्वा) या अंगाचे महत्त्वाचे योगदान असते. कौमार्य अवस्था संपल्यानंतरच उल्वेत मूल जन्मण्याच्या दृष्टीने योग्य बदल नैसर्गिकरीत्या घडतात. सर्वसाधारणपणे योनी असाही उल्वेचा उल्लेख करण्यात येतो. तिचा लोकभाषेतील पुच्ची किंवा भोक असा उल्लेख शिवराळ आणि असभ्य मानला जातो.

मादीची जननेंद्रिये हा लेख इंग्रजी विकिपीडियावरून लोकसंख्या शिक्षण संबधीच्या लैंगिक आरोग्य दालन आणि प्रकल्प विषयाशी संबधित असून त्याचा उद्देश विश्वकोशीय स्वरूपात केवळ दर्जेदार लैंगिक शिक्षण उपलब्ध करणे एवढाच आहे. त्यामुळे नोंदीकृत सदस्यांच्याच संपादनाकरता हा सुरक्षित करावा अशी प्रचालकांना विनंती केली आहे. हे पान अर्धसुरक्षित करावे किंवा कसे या बाबतीत आपली मते चर्चा पानावर नोंदवावीत. इतर सर्व सदस्यांना या लेखाचे नाव मादीची जननेंद्रिये असेच असू द्यावे. मानवी स्त्रीची जननेंद्रिये असे असावे की मानवी मादीची जननेंद्रिये असे असावे याबद्दल चर्चा पानावर आपले मत नोंदवावे. तसेच यालेखात बरेच नवे पारिभाषिक शब्द वापरलेले आढळतील, त्यापेक्षा अधिक चांगले चपखल सुयोग्य बदल करा.

बाह्य जननेंद्रिय ओळख

 
स्त्रीची जननेंद्रिये
 
स्त्रीची बाह्य जननेंद्रिये

उंटाचे खूर

काही वेळा स्त्रीयांनी परिधान केलेल्या तंग कपड्यांमूळे जो बाह्य भगोष्ठांभोवती जो आकार बनतो त्यास बोली भाषेत उंटाचे खूर म्हणतात.[ संदर्भ हवा ]

मानवी वजन व स्त्रीची शरीरयष्टी तसेच पोषाख यावर योनिपुष्ठतेचा पोषाखास कसा उठाव येतो ते अवलंबून असते.

शिश्ना किंवा भेगशिश्ना

भेगागशिश्न (Clitoris) मुलायम उतींनी ने बनलेला, अंडाकार आकृतिचा,छोटी जिवणी(लिबिया मिनोरा) आणि जिवणीटोप(क्लिटोरल हुड)च्या मध्ये छोटा भाग असतो.हे संभोग उत्तेजनाकरीता स्त्री शरीरातील एक संवेदनशील अंग असते.थोड्याशाही ताणाने किंवा दबावाने भगनासा बाहेर दिसू लागते.हि उत्तेजना आणि आवेगात रक्तवाहीन्या रक्तान भरून कडक व मोठी होते.वस्तुतः येथे शिश्ना (क्लिटोरी) एका कोश संरचने राहते जिला क्लिटोरी हुड किंवा जिवणीटोप म्हणतात जो कि संभोग क्रिये दरम्यान मागे ओढला जातोअ.खूप महिलांची शिश्ना छोटी असते तर बऱ्याच जणींची जिवणीटोपाने बंद होणार नाही एवढी मोठी असू शकते.

बाह्य भेगोष्ठ

भेगाच्या बाहेरील गुच्छेदार भागाला बाह्य भेगोष्ठ ( Labia Majora),बाह्य जिवणी म्हणतात.येथे स्पर्शाने खूप उत्तेजना होते.सामान्यत: हा बाह्य भेगोष्ठ मुलायम केसांनी झाकलेला असतो.यात घाम आणि आम्ल स्त्राव ग्रंथि असतात.या ग्रंथितील सलिल स्त्रावाने स्त्री भावना कामुक झाल्याचे लक्षात येते .

छोटी जिवणी

बाह्य जिवणीच्या म्हणजेच बाह्य भेगोष्ठाच्या आतील ओंठासारख्या हलकी उभारी असलेल्या कठोर संरचनेस छोटी जिवणी किंवा आंतरिक भेगोष्ठ( Labia Minora) म्हणतात.हिचे मुख्य काम भेगशिश्ना (clitoris) आणि मूत्रद्वारास आवरण उपल्ब्ध करणे आहे.हि बाह्य भेगोष्ठपेक्षा अधिक संवेदी पण कमी गुच्छेदार असते.आणि तीथे स्पर्श केल्यास माधा उत्तेजीत होते

मूत्रद्वार

मूत्रद्वार( Urethra)येथून शरीरातील मूत्र उत्सर्जन होते. ही कामुक नसते.हि भगनासाच्या खाली आणि योनिद्वारच्या समोर आढळते.परंतु ग-बिंदू मैथूनात द्रव्यपात येथूनच होतो.तीच्या शरीरातील स्थानामुळे संभोग काळात तिला रोग संक्रमण होऊ शकते.

योनिद्वार

योनि संभोग क्रियेचे हे सर्वात महत्त्वपूर्ण अंग असते.हि योनिद्वारने ( Vaginal Orifice)सुरू होउन गर्भाशय मुख पर्यंत जाते.हिला जन्म नलिका म्हणूनपण ओळखले जाते.हिच्यात स्निग्ध द्रवाचा स्त्राव ग्रंथि मोठ्या प्रमाणावर आढळतात. ज्यामुळे पूर्ण नलिकेत उत्तेजना आणि संभोग क्रिया काळात स्निग्धता टिकून राहते. संभोग क्रियेत योनिद्वारतूनच पुरूष लिंगाचा प्रवेश होत असतो.

योनिपटल

योनिपटल(Hymen) ही एक योनिमार्गास झाकणारा पातळ पापुद्रा असते.हि केवळ मासिक पाळीस प्रवाहित होऊ देते.योनिपटल पापुद्रा संभोगक्रीयेत तुटणे नैसर्गिक असते.हि तुटताना हलका रक्त स्त्राव होणे व थोडे दुखणे स्वाभाविक असते व घाबरण्यासारखे काही नसते.यामुळे बराच काळ योनिपटलास कौमार्याची ओळख मानले जायचे.पण हा पापुद्रा केवळ सहवास,खेळणे,दुचाकी चालवणे,पोहणे आदी व्यायाम प्रकारात पण तुटते.यामुळे प्रथम संभोगापुर्वीच योनिपटल पापुद्रा तुटला असेल व रक्तस्त्राव झाला नाहीतर महिलेचा कौमार्य भंग झाला आहे असा अर्थ होत नाही याची जाणीव लैंगिक शिक्षणाच्या माध्यमाने नवपरिणित तरुणांना करून देणे आवश्यक ठरते.

पेरिनियम

योनी आणि गुदद्वार मधील त्वचेस पेरिनियम (Perineum) म्हणतात. ह्या त्वचे खाली रक्त्वाहीन्यांचे मोठे जाळे असते. संभोग क्रियेपूर्वीच्या प्रणयक्रीडेत पेरिनियमला थोपटल्यास आनंदाची अनुभूती आणि उत्तेजनेचा संचार होतो[ संदर्भ हवा ].