माज्या जल्माची चित्तरकथा

(माज्या जल्माची चित्तरकथा (आत्मचरित्र) या पानावरून पुनर्निर्देशित)

माज्या जल्माची चित्तरकथा हे मराठी लेखिका शांताबाई कांबळे यांचे आत्मकथन आहे. दलित वाङ्मयातील महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले दलित स्त्रीचे आत्मकथन आहे.[१]

माज्या जल्माची चित्तरकथा
लेखक शांताबाई कांबळे
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार आत्मचरित्र
प्रकाशन संस्था उषा वाघ, सुगावा प्रकाशन
प्रथमावृत्ती १९८२
चालू आवृत्ती ११ मे १९९८ (कितवी?)
मुखपृष्ठकार चंद्रकांत कांबळे
विषय स्त्रीजीवन, दलितजीवन
पृष्ठसंख्या १५०
आय.एस.बी.एन. 8 1-86182-34-

दिनकर साक्रिकरांच्या प्रयत्नातुन १९८२ साली 'पूर्वा' मासिकात प्रथमतः छापण्यात आले.

पार्श्वभूमी संपादन

कांबळे ह्या जन्माने महार, पुढे १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने धर्मांतर, महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बेलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धूऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित 'नोरा' मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून सत्ता मिळवून निवृत्त झाली.

मालिका संपादन

या पुस्तकावर आधारीत नाजुका नावाची मालिका आली आहे.[२]

संदर्भ संपादन

  1. ^ "Majhya Jalmachi Chitra Katha(TYBA) Shantabai K. Kamble". Archived from the original on 19 July 2011.
  2. ^ नाजुका मालिका