माहिती संपादन

 
Mahogany-bark (5607477894)
 
Swietenia mahagoni Boynton Beach starr-090924-5920

महोगनीच्या दोन उपजाती आहेत.स्पॅनिश महोगनी,होंडूरास महोगनी स्वीटेनिया महोगनी मायक्रोफायला साधारणपणे ६० फूट उंच वाढतो.याची वाढ तशी संथच आहे.स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायला त्यामानाने झपाट्याने वाढतो आणि जास्त कणखर आहे.हा साधारण ५० ते ७० फूट उंच वाढतो.स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायलाची पानं आकाराने थोडी मोठी,गडद हिरवी आणि चकचकीत असतात.महोगनीच्या पानगळीचा काळ फार थोडा असल्यामुळे अगदी निष्पर्ण अशी ही झाडं कधी दिसतच नाहीत.महोगनीचे खोडही अगदी लक्षात रहाण्यासारखे आहे.काळसर खोडाच्या सालीवर पडलेल्या भेगांमुळे सालीचे पापुद्रे निघतात आणि पूर्ण खोड खवले पांघरल्यासारखे दिसते. महोगानीची फुलं अतिशय लहान,हिरवट पांढरी असतात. लहान आकार आणि हिरवट रंगामुळे फुलांचे गुच्छ काही नजरेत भरत नाहीत.त्याच्या लांबट गोल,टणक फळामध्ये पातळ पंख असलेल्या बिया असतात. स्वीटेनिया महोगनी मॅक्रोफायलवर बरेच महिने ही फळं पहायला मिळतात.फळ फुटल्यावर आतल्या बिया वाऱ्याबरोबर पसरतात.दोन्ही प्रकारच्या महोगनींची लागवड बियांपासून करतात.दमट आणि कोरड्या अशा दोन्ही प्रकारच्या हवामानात ही वाढतात.समुद्रकाठची खारी हवाही यांना मानवते.याचा खरा उपयोग फर्निचरसाठी होतो.टणकपण आणि लालसर रंग यामुळे महोगनीचं लाकूड फर्निचरसाठी उत्तम!मॅक्रोफायलाचं लाकूड जरा कमी प्रतीचं मानतात.याच्या सालीचा उपयोग कातडी कमावण्यासाठी होतो महोगनीचा गर्द लाल रंग यामुळे मिळतो.सालातून डिंकही मिळतो.जखमांवर ॲस्ट्रिंजंट म्हणून तसेच ताप वगैरे रोगांवर औषधी आहे.पण आपल्यासाठी याचा खरा उपयोग म्हणजे याची सागर्द वली होतो.

संदर्भ संपादन

वृक्षराजी मुंबईची

डॉ.मुग्धा कर्णिक