महेंद्र कदम
(महेश कदम या पानावरून पुनर्निर्देशित)
डाॅ. महेंद्र सुदाम कदम यांचे मूळ गाव वडशिंगे ता. माढा, जि. सोलापूर हे आहे. त्यांचे शिक्षण एम. ए. पीएच.डी आहे. ते बी.ए. आणि एम. ए.च्या परीक्षेत मराठी विषयातून शिवाजी विद्यापीठात (कोल्हापूर) सलग पाच वर्षे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण आहेत. त्याबद्दल त्यांना वि. स. खांडेकर, पु. भा. भावे, माधव जुलीयन आदी दहा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक होते. तत्पूर्वी त्यांनी कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागात दोन वर्षे प्राध्यापक म्हणून कार्य केले आहे. तेथे त्यांनी पदव्युत्तर वर्गांना भाषाविज्ञानाचे अध्यापन केले आहे.
- सध्या ते विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी (सोलापूर) येथे प्राचार्य म्हणून गेली पंधरा वर्षे कार्यरत आहेत. महेंद्र कदम यांची समीक्षक आणि कादंबरीकार म्हणून ओळख आहे. त्यांनी कथा, कविता लेखनही केले आहे. त्यांनी सोलापूर विद्यापीठाचे मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठातापदही (Dean) भूषवले आहे.
- त्याचबरोबर त्यांनी सोलापूरसह अनेक विद्यापीठात विविध प्राधिकरणांवर सदस्य म्हणूनही कार्य केले आहे. करीत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिभाषा कोश निर्मिती, महाराष्ट्र परिनिरीक्षण मंंडळाचे ते सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्र शासन, युजीसी, नवी दिल्ली यांच्याकडून त्यांना संशोधन प्रकल्पासाठी अनुदान प्राप्त झाले आहे.
- "आगळ" या कादंबरीतील 'आजी: कुटुंबाचं आगळ' या शीर्षकाचा एक पाठ एस.एस.सी. बोर्डाच्या दहावीच्या (मराठी) अभ्यासक्रमात २०१८ पासून समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच याच कादंबरीतील एक पाठ अमरावती विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.
- "आगळ" या कादंबरीचा राणी अहिल्यादेवी विश्वविद्यालय, इंदौर (मध्यप्रदेश) येथे एम. ए. च्या अभ्यासक्रमात २०२१ पासून समावेश झाला आहे.
- "धूळपावलं" ही कादंबरी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या बी. ए. भाग- १ च्या मराठी (आवश्यक) अभ्यासक्रमात २०२२ पासून समावेश झाला आहे.
- "मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान, कवितेची शैली, कादंबरी: सार आणि विस्तार हे ग्रंथ महाराष्ट्रातल्या जवळपास सर्व विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच त्यांचे मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान हे पुस्तक यु.पी.एस.सी (UPSC)च्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेले आहे.
महेंद्र कदम यांनी लिहिलेली पुस्तके
संपादन- धूळपावलं (कादंबरी)
- आगळ (कादंबरी)
- तणस (कादंबरी)
- तो भितो त्याची गोष्ट (कथासंग्रह)
- तू जाऊन तीन तपं झाली (दीर्घकविता)
- कवितेची शैली (शैलीविज्ञान)
- कवितेचे वर्तमान (समीक्षा लेखसंग्रह)
- कादंबरी: सार आणि विस्तार ( कादंबरी समीक्षा)
- मराठीचे वर्णनात्मक भाषाविज्ञान (भाषाविज्ञान)
- टाचाटिभ्याचे क्रांतिपर्व (लहू कानडे यांच्या कवितेचे समीक्षा संपादन)
- मेघवृष्टी: अभ्यासाच्या विविध दिशा (संपादित: जयराम खेडेकर यांच्या कवितेची समीक्षा)
- भाषा: अवकाश आणि उपयोजन
पुरस्कार
संपादन- महेंद्र कदम यांच्या 'कवितेची शैली' या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा 'दादोबा पांडुरंग भाषाशास्त्र पुरस्कार' मिळाला आहे.
- त्याचबरोबर त्यांना *भैरुरतन दमाणी, सोलापूर *दादोबा पांडुरंग, वर्धा *अण्णा भाऊ साठे, कोल्हापूर
- राजर्षि शाहू महाराज पुरस्कार बार्शी, *आदर्श शिक्षक पुरस्कार, पुणे *भि.ग. रोहमारे, कोपरगाव
- मुक्ताई पुरस्कार, जालना * मनोरमा पुरस्कार, सोलापूर आदी अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.