महाविदा
(महा माहिती या पानावरून पुनर्निर्देशित)
ज्या पारंपरिक माहिती प्रक्रिया प्रणालीत पुरेशा अभ्यासल्या जात नाहीत अशा अतिशय क्लिष्ट आणि मोठ्या माहिती संचाला(Data Setला) महा माहिती अथवा Big Data असे संबोधले जाते. अश्या प्रकारच्या माहिती प्रक्रियेमध्ये मोठ्या माहिती संचाचा अभ्यास, योग्य माहिती संच बनवणे, शोध, प्रसार, साठवणे, प्रदर्शित करणे, योग्य माहिती विचारणे आणि माहिती गुप्तता अशी आव्हाने असतात. ही संकल्पना सूचक विश्लेषणांच्या (Predictive Analysis) आणि इतर माहिती संकलनाच्या प्रक्रियेमध्ये वापरली जाते.