महावित्त किंवा महाराष्ट्र राज्य वित्तिय महामंडळ याची स्थापना इ.स. १९६२ साली भारताच्या लोकसभेने संमत केलेल्या राज्य वित्तिय महामंडळे कायदा १९५१ अन्वये करण्यात आली. लघु आणि मध्यम उद्योगांना जमीन, इमारत, यंत्रसामुग्री, उपकरणे इत्यादी प्रकारची स्थावर मालमत्ता संपादन करण्यासाठी लागणाऱ्या मुदत कर्जाची गरज भागविणे हे महावित्तचे मुख्य कार्य आहे.