महाराष्ट्र (वृत्तपत्र)

महाराष्ट्र
प्रकारदैनिक

मालकगोपाळराव ओगले
प्रकाशकविष्णूशास्त्री पंडित
स्थापना१८९७,
भाषामराठी
प्रकाशन बंद१९७७
मुख्यालयभारत महाराष्ट्र, भारत


इतिहास

संपादन

केसरीच्याच परंपरेतील, पण मध्यप्रांत वऱ्हाड या हिंदी व मराठी भाषांचा वापर असलेल्या द्विभाषी प्रांतात गाजलेले पत्र म्हणून महाराष्ट्र या पत्राचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्र पत्र सुरू करून ते लोकप्रिय करण्यात पुण्यातुन नागपूरला गेलेले लो. टिळकांच्या राजकारणाने एक निष्टवंत कार्यकर्ते गोपाळ आनंद उर्फ दादासाहेब ओगले यांचा पुढाकार होता.नागपूरकर भोसल्यांच्या हातून ब्रिटिशांनी सत्ता उशिरा काबेज केल्याने वृत्तपत्रासारखा आधुनिक साधनांचा उद्भभवही तेथे उशिरा झाला.

सुरुवात

संपादन

सुरुवातीला अर्थातच सरकारशी विरोध न ठेवण्याऱ्या नेमस्त वृत्तपत्राचा काळ होता. ही वृत्तपत्रे लोकमत बनवण्याच्या दुष्टीने फारसे कार्य करू शकली नाहीत. फारकतीचा व पोटगीच्या नोटिसांच्या उत्पनावर टी वृतपत्र ही पत्रे तगत असत. अश्या पत्रातून विचार,आठवणी नोद्विल्या आहेत.१८९७ साली टिळकांना शिक्षा झाल्यानंतर नागपुरात एक टिळकपक्षीय गट तयार होऊ लागला होता. पण मध्यप्रांतात नोकर शाहीचा वरचेष्मा अधिक होता व त्यात दडपडशाहीच्या धोरणाची भर पडली. १९१० च्या प्रेस कायद्याने जवळ जवळ १९१४ परेंत राष्ट्रीय वृत्तपत्रांना डोके वर काढू न देण्याचे धोरण पद्धतशीरपणे अवलंबित गेले. पण बंगालच्या फाळणीनंतर झालेल्या चळवळीने जागृतीचे लोन सर्वत्र पसरू लागले होते. त्यामुळे लोकांत वृत्तपत्राची आवड वाढू लागली आहे.

नटेश आप्प्जी द्रविड

संपादन

देशसेवक हातचे गेल्यानंतर नागपूरला माधवराव पाध्ये हितवादी पत्र चालवीत असत. हे साप्ताहिक १९१३ सालीना गोखले यांच्या भारतसेवक समाजाने आपल्याकडे घेतले व नटेश आप्प्जी द्रविड यांच्या संपादनाखाली ते इंग्रजीतून सुरू करण्यात आले. [व्यक्तिलक्ष्य तर्कदोष]देशसेवकचे संपादकपद भूषवून तुरुंगवास भोगलेले कोल्हटकर तुरुंगातून सुटल्यावर बंद पडलेले पत्र पुन्हा सुरू करू शकले नव्हते. त्यांची विकीलीची सनदही रद्द करण्यात आली. अशा सिस्थित नागपूरला राहण्याएवजी –मुंबईला स्थलांतर करण्याचा निर्णय अच्चुतराव यांनी घेतला. डॉ.मुंजे प्रभूतींना देशसिविकांचे पुनर्जीवन करावे असे वाटत होते तरी अच्चुतराव पुन्हा नागपूरला येण्यास तयार झाले नाहीत. पण डॉ. मुंजे व त्यांच्या सहकार्यांना पत्र काढण्याचा निर्णय पक्का होता. म्हणून डॉ. मुंजे यांनी नागपूरला स्थिर राहून वृत्तपत्राची जबाबदारी घेईल अश्या व्यक्तीचे नाव सुचवण्याची गळ घातली.

संपादक

संपादन

गोपाळ आनंत ओगले :- महाराष्ट्राचे संपोदक गोपाळराव तथा दादासाहेब ओगले यांनी भरपूर मोकळीक देण्याची दूरदृष्टी दाखवली ती वृत्तपत्राच्या नव्या वळणाला पोषक ठरली. संदेशकार अच्चुतकर कोल्हटकरांची संगत देससेविकात लाभली होती. परंतु लेखनाची ओगले यांची पद्धत अचूतरावी नव्हती.तिला स्वताचे स्वतंत्र वळण होते. महाराष्ट्र वृत्तपत्र बंद पडल्यावर एक नामवंत वृत्तपत्र संस्था कायमची काळाच्या पडद्याआड गेली. पत्र चालू रहावे म्हणून संस्थेचे ट्रस्टमध्ये रूपांतर करण्याची दूरदुर्ष्टी संस्थापक गोपाळ आनंद ओगले यांनी दाखवली होती. बदललेल्या परिस्थितीत जुन्या पद्तीने पत्र चालविणे शक्य नव्हते हे खरे. पण पत्र सावरले केले नाही. महाराष्ट्र अस्तंगत झाला तरी, मराठी वृत्तपत्राच्या इतिहासातील एक मैलाचा, खुणेचा स्तंभ हे त्याचे स्थान मात्र कायम राहणार आहे.

संदर्भ[]

संपादन
  1. ^ लेले, रा.के. (२००४). मराठी वृत्तपत्राचा इतिहास. पुणे. pp. ५२०.