महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन २०१०
[./Https://en.m.wikipedia.org/wiki/Maharashtra_Security_Force ....महाराष्ट्र राज्स सुरक्षा महामंडळ अधिनियम २०१० नूसार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रातील राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आस्थापना तसेच इतर महत्त्वाच्या औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांचे संरक्षण आणि सुरक्षेचे कार्य प्रशिक्षित व सुसज्ज सुरक्षा कर्मचारी सेवा पुरवून कार्यक्षमपणे करत आहे. औद्योगिक आणि वित्तीय संस्था, विमानतळ, महामुंबई मेट्रो, सिडको मेट्रो, औष्णिक वीज निमिर्ती केंद्रे, गॅस वितरण आणि पारेषण कंपन्या, रुग्णालये, टाटा मूलभूत संशोधन संस्था, एक्सप्रेसवे, वेस्टर्न कोलफिल्ड इ. प्रकारच्या ३०० हून अधिक संवेदनशील व महत्त्वाच्या आस्थापनांना महामंडळाकडून सद्यस्थितीत सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात येत आहे.
महामंडळ राज्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात निर्णायक भूमिका बजावत आहे. राज्याला उद्योग अनुकूल बनवण्यासाठी आणि शांततापूर्ण वातावरण टिकवून ठेवणे यासाठी महामंडळाची सुरक्षा महत्त्वाचे योगदान देत आहे.
असामाजिक आणि आतंकवादी घटक यांच्या संभाव्य धोक्यापासून आस्थापनांचे संरक्षण करणे व त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नरत राहणे हा महामंडळाचा प्रधान हेतू आहे. त्यानूसार सर्वतः सम्यक रक्षामि हे ध्येय वाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी महामंडळ कठोर मेहनत घेत आहे.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची ठळक वैशिष्ठ्ये
संपादन- सुरक्षा रक्षकांची निवड कठोर व स्पर्धात्मक प्रक्रियेच्या आधारे केली जाते. निवड करताना त्यांच्या शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस पाहिला जातो.
- सुरक्षा रक्षकांची चारित्र्य व पूर्वेतिहास पडताळणी काटेकोरपणे केली जाते.
- निवड झालेल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकास भारतीय दंड विधान संहिता १८६० च्या कलम २१ अनूसार लोक सेवक म्हणून गणले जाते. तसेच त्यास महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम २०१० च्या कलम १८ (१) अनूसार त्यास विशेष पोलीस अधिका-याचा दर्जा बहाल करण्यात आलेला आहे.
- सुरक्षा रक्षकांना पोलीसांप्रमाणे अटक करण्याचे अधिकार प्राप्त आहेत.
- म.रा.सु.म. अधिनियम, २०१० च्या कलम १८ (२) अन्वये, सुरक्षा दलाच्या प्रत्येक सदस्याला, त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे सोपवलेली शस्त्रास्त्रे वापरण्याचा अधिकार आहे.
- म.रा.सु.म तर्फे आवश्यकता व मुल्यांकनानुसार सशस्त्र सुरक्षा रक्षकांची सेवा पुरविण्यात येते.
- सुरक्षा रक्षक हे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असल्याने त्यांना येथील सामाजिक / सांस्कृतिक / राजकीय परिस्थितीची चांगली जाण आहे.
- एकदा निवड झाल्यानंतर कठोर प्रशिक्षणास सामोरे जावे लागते. सदर प्रशिक्षणामध्ये कवायत / शस्त्र हाताळणी / कौशल्य / कर्तव्याकरिता आवश्यक असणारे सामरिक ज्ञान दिले जाते. त्यांना बॉम्ब शोधक व नाशक पथक / महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे / केंद्रीय राखीव पोलीस दल आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या अधिका-यांकडून प्रशिक्षण दिले जाते.
- भारतीय पोलीस सेवेतील कार्यरत असणा-या अधिका-यांकडून भरती / प्रशिक्षण / कार्यपद्धती आणि शिस्त याचे पर्यवेक्षण केले जाते.
- सुरक्षा रक्षक हे पोलीस (असंतोषास उत्तेजना) अधिनियम, १९२२ तसेच पोलीस दल (अधिकारांचे निर्बंध) अधिनियम, १९६६ द्वारे नियंत्रित केले जात असल्याने ते कोणत्याही संघटनेची स्थापना करू शकत नाहीत किंवा त्या संघटनेत सामिल होऊ शकत नाहीत. अथवा कोणत्याही आंदोलनामध्ये संघटीतरित्या सहभागी होऊ शकत नाहीत.
- सुरक्षा रक्षकांची तैनाती ही गतीमानतेने व प्रमाणयोग्य पद्धतीने होते. परंतु, त्यामध्ये कामाचे स्वरूप व सुरक्षा रक्षक संख्या यामध्ये विलंब न करता बदल केला जाऊ शकतो.
- भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ तसेच कार्यरत अधिका-यांचे कामकाजावर देखरेख असल्याने पोलीस तसेच इतर प्रशासकीय विभागाशी आवश्यकतेनुसार उत्तम संपर्क साधला जातो