महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी, नाशिक

महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी ही महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय एकमेव प्रशिक्षण संस्था आहे. या संस्थेची स्थापना नाशिक मध्ये १९६४ साली झाली. या संस्थेमार्फत कनिष्ठ अभियंता ते अधीक्षक अभियंता पर्यंतच्या पदावरील शासकीय सेवेत कार्यरत अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाते तसेच जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने नियुक्त होणाऱ्या सहाय्यक अभियंता श्रेणी-2, सहाय्यक अभियंता श्रेणी-1 व सहाय्यक कार्यकारी अभियंता तसेच यांना एक वर्षाचे प्रतिष्ठापन प्रशिक्षण देण्यात येते.

कामे संपादन

  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी नाशिक ही संस्था जलसंपदा विभागातील व सार्वजनिक बांधकाम विभागातील उप अभियंता ते मुख्य अभियंता यांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य प्रशिक्षण धोरणानुसार व नियमित मंजूर वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रमानुसार प्रशिक्षण देण्यासाठी असुन त्यानुसार निरनिराळ्या प्रशिक्षण वर्गांची अंमलबजावणी महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी व प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र पुणे/ नागपूर/ औरंगाबाद यांच्या मार्फत सुरू आहे.
  • मेटा नाशिक येथे महाराष्ट्र शासनाच्या 23/09/2011च्या राज्य प्रशिक्षण धोरणानुसार खालील पाच प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात.
  • पायाभूत प्रशिक्षण
  • बदली नंतरचे प्रशिक्षण (कामकाजात बदल)
  • उजळणी प्रशिक्षण
  • पदोन्नती नंतरचे प्रशिक्षण
  • नवीन विषयांची तोंडओळख
  • शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे जलसंदा विभागातील सर्व उप अभियंता व शाखा अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी -2चे ई-जलसेवेचे STeJEचे नियमित प्रशिक्षण वर्ग प्रबोधिनी व नागपूर व औरंगाबाद येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्रांत सुरू आहेत.
  • महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनी मार्फत सन 2016-17 या कालावधीत सरळसेवेने जलसंपदा विभागात नियुक्त झालेले सहाय्यक कार्यकारी अभियंता व सहाय्य अभियंता श्रेणी -1 असे एकूण 102 अधिकाऱ्यांनी माहे डीसेंबर 2016 अखेर त्यांचे 1 वर्षाचे पायाभूत प्रतिष्ठापन प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता व सहाय्यक अभियंता श्रेणी 1 एकूण 74 प्रशिक्षणार्थी यांनी देखील त्यांचे 1 वर्ष कालावधीचे पायाभूत प्रतिष्ठापन प्रशिक्षण माहे मार्च 2017 अखेर पर्यंत पूर्ण करणार आहेत.
  • या संस्थे अंतर्गत कार्यरत असलेली प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र पुणे / औरंगाबाद व नागपूर यांचेही प्रशिक्षणाचे व प्रशासकीय नियंत्रणाचे काम प्रबोधिनीकडे आहे.