महाराष्ट्रातील २१ गणेशस्थाने
महाराष्ट्रात पवित्र आणि बहुशः स्वयंभू समजली जाणारी गणपतीची २१ स्थाने आहेत, ती अशी :-
- कसबा गणपती , पुणे - ग्रामदेवता
- गणपती देवस्थान, सांगली - सांगलीचे आराध्य दैवत
- गणपती - बाळगीर महाराजांचा मठ , नांदेड - नवसाला पावणारा गणपती, अशी प्रसिद्धी
- गणपती - सिताबर्डी, नागपूर
- गणपतीपुळे - जागृत समजली जाणारी स्वयंभू देवता
- चिंतामणी - कळंब ( यवतमाळ ) - जागृत समजले जाणारे देवस्थान
- तळ्यातील गणपती (सारसबाग, पुणे)
- दशभुजा गणपती, हेदवी - गुहागरपासून जवळ
- बल्लाळ विनायक - मरूड (जिल्हा रायगड)
- मंगलमूर्ती - चिंचवड - जागृत समजले जाणारे देवस्थान
- महागणपती - टिटवाळा
- महागणपती - नवगण राजुरी (बीड - मराठवाडा )
- महागणपती राजूर (औरंगाबाद) - भारतातील साडेतीन गणेश पीठांपैकी हे पूर्ण पीठ, स्वयंभू गणेश
- माळीवाडा गणपती - अहमदनगर - १० फूट उंच, उजव्या सोंडेची मूर्ती
- मोदकेश्वर, नाशिक
- विज्ञानगणेश - राक्षसभुवन (मराठवाडा) जालन्यापासून ३६ मैलावर, गोदावरी काठी, दत्तात्रेयांनी स्थापना केली, असे सांगितले जाते.
- सिद्धिविनायक - आंजर्ले (दापोली
- सिद्धिविनायक, तासगाव (सांगली) - उजव्या सोंडेची गारेची मूर्ती, नवसाला पावणारा गणपती अशी प्रसिद्धी
- सिद्धिविनायक , नांदगाव - (जिल्हा रायगड)
- सिद्धिविनायक - प्रभादेवी , मुंबई
- दिगंबर सिद्धिविनायक - कडाव, तालुका कर्जत. प्राचीन मूर्ती, अत्यंत जागृत समजले जाणारे देवस्थान