महाराष्ट्रातील वीजनिर्मिती प्रकल्प
महाराष्ट्र हे वीजनिर्मितीत भारतातील सर्वात आघाडीचे राज्य आहे. देशात निर्माण होणाऱ्या एकूण विजेच्या १५ टक्के निर्मिती महाराष्ट्रात होते.परंतु तरीही मागणीचे प्रमाण हे वीजनिर्मितीपेक्षा जास्त असल्याने गेली काही वर्षे महाराष्ट्रातील जनतेला वीजटंचाईचा सामना करावा लागत आहे.
महाराष्ट्रात वीजनिर्मिती ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते त्यात प्रामुख्याने ऊर्जानिर्मितीसाठी दगडी कोळसा खनिज तेल व नैसर्गिक वायू जलविद्युत याचा वापर केला जातो वीजनिर्मिती करता वापरली जातात हे टर्बाइन्स फिरवण्यास करिता ज्या ऊर्जेचा वापर केला जातो त्यानुसार औष्णिक विद्युत जलविद्युत अनुविद्युत नैसर्गिक वायू विद्युत असे प्रकार पडतात.
सद्य वीजनिर्मिती प्रकल्प
संपादनक्रमांक | प्रकल्प | क्षमता (मेगावॅट मध्ये) |
प्रकार |
१ | चंद्रपूर | २३४० | औष्णिक |
२ | भुसावळ | ४७८ | औष्णिक |
३ | खापरखेडा | ८४० | औष्णिक |
४ | कोराडी | १०८० | औष्णिक |
५ | नाशिक | ९१० | औष्णिक |
६ | पारस | ५८ | औष्णिक |
७ | परळी | ६९० | औष्णिक |
८ | पोफळी | १९६० | जलविद्युत |
९ | उरण | ८५२ | औष्णिक (नॅप्था) |
एकूण | ९२०८ |
या प्रकल्पांखेरीज टाटा पॉवर ही कंपनी जलविद्युत प्रकल्पाद्वारे स्वतंत्र वीजनिर्मिती करत आहे ज्याचा पुरवठा मुंबईला होतो. तसेच पवनउर्जेपासुन व इतर अपारंपारिक स्त्रोतांनी साधारणपणे १५०० मेगावॅट इतकी उर्जा तयार होते. सद्य स्थितीत महाराष्ट्राची गरज साधारणपणे १३,००० मेगावॅट इतकी असून साधारणपणे ३ ते ४ हजार मेगावॅट इतके उर्जा उत्पादन कमी पडत आहे. याचे व्यवस्थापन होण्यासाठी महाराष्ट्रात सद्यस्थितीत बहुतेक सर्व जिल्ह्यात भारनियमन(लोडशेडींग) केले जात आहे. एन.टी.पी.सी कडून महाराष्ट्राला राष्ट्रीय कोट्यातून २००० मेगावॅट इतकी उर्जा मिळते आहे.
प्रस्तावित वीजनिर्मिती प्रकल्प
संपादनक्रमांक | प्रकल्प | क्षमता (मेगावॅट मध्ये) |
प्रकार | वेळापत्रक |
१ | चंद्रपूर | १००० | औष्णिक | मार्च २०१२ |
२ | भुसावळ | १००० | औष्णिक | डिसेंबर २०१० |
३ | खापरखेडा | ५०० | औष्णिक | जून २०१० |
४ | कोराडी | १९८० | औष्णिक | जुन २०१४ |
५ | नाशिक | (प्रस्ताव नाही) | औष्णिक | |
६ | पारस | २५० | औष्णिक | जुन २००९ |
७ | परळी | २५० | औष्णिक | |
८ | पोफळी | (प्रस्ताव नाही) | जलविद्युत | |
९ | उरण | (प्रस्ताव नाही) | औष्णिक (नॅप्था) | |
एकूण | ४९८० |
या तक्त्यात पाहिल्याप्रमाणे महाराष्ट्रात जून २०१४ पर्यंत साधारणपणे १४,००० मेगावॅट इतकी वीज उपलब्ध असेल परंतु तोवर वीजेची मागणी वाढून हेही कमी पडण्याची शक्यता आहे. परंतु औष्णिक वीजप्रकल्पांचा पर्यावरणावर होणारा विचार लक्षात घेता वीजनिर्मितीत अमूलाग्र व पटकन बदल करण्याची गरज आहे.
विजनिर्मिती प्रकल्पांचे प्रकार
संपादनविद्युत केंद्रातले टर्बाइन चालविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उर्जेचा वापर होतो त्यावरून मुख्यत्वे त्या विजनिर्मिती प्रकल्पाचा प्रकार निश्चित होतो. महाराष्ट्रात मुख्यत्वे खालील प्रकारचे वीजनिर्मिती प्रकल्प आहेत:
सौर उर्जा निर्मिती प्रकल्प
संपादनमहाराष्ट्रात नुकताच चंद्रपूर येथे १ मेगावॅट क्षमतेचा सौर संच उभारण्यात आला.तो महानिर्मिती या कंपनीतर्फे उभारण्यात आलेला पहिला सौर संच आहे.
हे सुद्धा बघा
संपादन- महाजेनको(पूर्वीचे म.रा.वि.मं.) या कंपनीचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-08-15 at the Wayback Machine.
संदर्भ
संपादन- MSEB summary of current projects and future projects
- Energy scenario in india