जुमदेवजी ठुब्रीकर

(महानत्यागी बाबा जुमदेवजी या पानावरून पुनर्निर्देशित)

जुमदेवजी ठुब्रिकर उर्फ महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचा जन्म ३ एप्रिल १९२१ रोजी नागपूर मधील एका नम्र आणि गरीब कुटुंबात झाला. त्यांचे वडील विठोबाजी ठुबरीकर विणकर होते आणि आई सरस्वतीबाई एक घरगृहिणी होती. बाबा जुमदेवजींना बाळकृष्ण, नारायण आणि जगोबा असे तीन मोठे आणि मारोती नावाचा एक धाकटा भाऊ होता. वडील विणकर असल्याने आणि त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे बाबा जुमदेवजी इयत्ता चौथीच्या पुढील शिक्षण घेऊ शकले नाही. इ.स. १९३८ मध्ये वयाच्या सतराव्या वर्षी बाबा जुमदेवजी यांचा विवाह वाराणसीबाईशी झाला. काही कारणांमुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित विणकामाचा व्यवसाय सोडला आणि त्यांनी सेठ केसरीमल यांच्याकडे काही वर्षे सुवर्णकार म्हणून काम केले. कालांतराने त्यांनी नागपूर महानगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.[][]

बाबा जुमदेवजींना महादेव नावाचा एकुलता एक मुलगा होता. अत्यंत बिकट परिस्थितीमुळे महादेवला उच्च शिक्षण घेणे कठीण झाले होते. परंतु बाबांनी त्यांना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित केले आणि परिणामी डॉ. महादेव उर्फ मनो जुमदेवजी ठुब्रिकर यांना इंजिनीअरिंग मध्ये अनेक प्रमाणपत्रांसह सन्मानित करण्यात आले. आज मनोहर ठुब्रिकर जगातील पहिल्या नऊ शास्त्रज्ञांपैकी सातवे नामांकित वैद्यकीय वैज्ञानिक आहेत.[][]

कालांतराने बाबा जुमदेवजी ने परमात्मा एक सेवक मानव धर्म मंडळाची स्थापना केली. त्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य तथा मानवी जीवनातील अंधश्रद्धा यावर मोठ्या प्रमाणावर कार्य केले. त्यांचे हे काम महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यात पोहोचले.[]

स्वर्गीय बाबा जुमदेवजी ठुब्रिकर यांच्या कार्याची दखल घेत १ ऑक्टोबर २०१३ रोजी तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ हमीद अन्सारी यांच्या हस्ते महान त्यागी व्यक्तिमत्व बाबा जुमदेवजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक टपाल तिकिटाच अनावरण करण्यात आले.[][]

संदर्भ

संपादन
  1. ^ a b Who was Baba Jumdevji (1921-1996). २८ मार्च २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Vice Prez releases postal stamp of Jumdev Baba". India TV. 2013-10-01. 2017-12-31 रोजी पाहिले.
  3. ^ "Q&A with Dr. Thubrikar of Thubrikar Aortic Valve, Inc. Founder & President" (इंग्रजी भाषेत). २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  4. ^ "बाबा जुमदेवजी के मार्ग पर निस्वार्थ भाव से आए सेवक" (हिंदी भाषेत). २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.
  5. ^ "बाबा जुमदेव पर जारी होगा डाक टिकट, केंद्रीय मंत्री सिब्बल ने दी मंजूरी" (हिंदी भाषेत). २८ मार्च २०२१ रोजी पाहिले.